The bridge collapsed due to rain and the car fell into the water Nine Year Old Boy Save Family members
महाराष्ट्र

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा कहर सुरूच, आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पावसाने कहर केला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. १ जूनपासून आतापर्यंत मुसळधार पावसामुळे 120 जणांचा मृत्यू झाला असून 240 जनावरांनाही जीव गमवावा लागला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

महाराष्ट्रात अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. IMD ने गुरुवारी मुंबई, पालघर, रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, सातारा, अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, चंद्रपूर, वाशीम आणि यवतमाळ येथे अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. तसेच गावांमध्ये पाणी शिरले आहे. अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर लोकांच्या अडचणीही वाढल्या आहेत.

अनेक ठिकाणी अतिवृष्टी :
राज्यात अतिवृष्टी आणि पुरासारख्या घटनांमध्ये 120 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच 240 जनावरांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. पावसामुळे 300 हून अधिक गावांचे नुकसान झाले आहे. तसेच 95 जण जखमी झाले आहेत. त्यात 19 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पालघर, वर्धा आणि नाशिकमध्ये तीन हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

NDRF च्या एकूण 13 टीम तैनात :
त्याचवेळी महाराष्ट्रात मदत व बचावकार्यासाठी NDRF च्या एकूण 13 टीम तैनात आहेत. ज्यामध्ये मुंबई-ठाणे, रायगड, सांगली आणि कोल्हापूर येथे एनडीआरएफच्या दोन पथके तैनात आहेत. तर प्रत्येकी एक टीम पालघर, रत्नागिरी, सातारा येथे आहे. एसडीआरएफच्या दोन तुकड्याही राज्यात तैनात आहेत. ही पथके नांदेड आणि गडचिरोली येथे तैनात करण्यात आली आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत