मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. कांद्याचे बाजारभाव पडण्याबाबत भाष्य करताना त्यांनी शेतकऱ्यांनाच यासाठी जबाबदार धरले आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, “एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात, कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहे, दुप्पट तिप्पट ठीक पण पन्नास पटीने कांद्याची लागवड करायला लागले, तर कांद्याचे बाजारभाव पडणारच.”
त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणींसाठी त्यांनाच जबाबदार धरून अशी वक्तव्ये करणे अयोग्य असल्याचा आरोप कोकाटेंवर होत आहे. तर सध्या कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी आधीच अडचणीत असून, त्यातच अशा प्रकारची विधानं त्यांच्या वेदनांवर मीठ चोळणारी आहेत.