lady did rape with minor boy pocso act
महाराष्ट्र

29 वर्षीय महिलेकडून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण, पॉक्सो कायद्यांतर्गत महिलेला अटक

अकोला : अकोल्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका महिलेवर अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी याप्रकरणी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली आहे. 17 वर्षीय मुलासोबत घडलेल्या या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 29 वर्षीय महिला पतीपासून वेगळी राहते, अशी माहिती मिळाली आहे. तिच्याजवळ तिच्या बहिणीची ९ वर्षीय मुलगी देखील राहते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला एका डाळ मिलमध्ये काम करते. तिथेच या महिलेची एका अल्पवयीन मुलाशी ओळख झाली. यादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू झाले. 31 जानेवारी रोजी आरोपी महिला आपल्या बहिणीच्या मुलीला घरी सोडून कुठेतरी गेली होती. दरम्यान, ही ९ वर्षीय मुलगी रडायला लागली, तिला रडताना पाहून शेजाऱ्यांनी तिच्या मावशीचा शोध सुरू केला. मात्र दोन दिवस तिचा काहीही पत्ता लागला नाही.

त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात महिला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली. यादरम्यान एक अल्पवयीन मुलगा देखील बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस त्याचाही शोध घेत होते. मात्र 9 फेब्रुवारी रोजी मुलगा अचानक घरी परतला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण समोर आले. मुलाने सांगितल्यानुसार आरोपी महिलेचा शोध घेऊन तिला अटक करण्यात आली. मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीरंगम यांनी सांगितले की, आरोपी महिलेची चौकशी सुरु आहे. तिचा जबाब नोंदवून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत