JSW will invest 4200 crores in Konkan
महाराष्ट्र

जेएसडब्लू कोकणात करणार 4200 कोटींची गुंतवणूक, पेण येथे होणार 960 मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प

रायगड : महाराष्ट्र हे देशामध्ये गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांची पहिली पसंती असून जेएसडब्लू कोकणामध्ये सुमारे ४२०० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले. पेण (रायगड) येथील जेएसडब्लू निओ एनर्जी प्रकल्पाच्या सामंजस्य करारासंदर्भात आयोजित मंत्रालयातील बैठकीत मंत्री सामंत बोलत होते. पेण येथे ९६० मे.वॅ. चा पीएसपी प्रकल्प होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जेएसडब्लूच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून थेट सुमारे ४५० तरूणांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार असून मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे रोजगार निर्माण होणार आहे. तरुणांना जास्तीत – जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभाग काम करीत असल्याचे सामंत यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यामध्ये ७५ हजार तरूणांना रोजगार देण्याचा मानस राज्य सरकारचा मानस असून त्याअनुषंगाने उद्योग विभाग कार्य करीत आहे. यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन व सर्व संबंधित उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत