मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता राज्यात पुढील चार-पाच दिवस अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवसांसाठी भारतीय हवामान खात्याकडून बऱ्याच जिल्ह्यांना हाय अलर्ट जरी करण्यात आले आहेत.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने संपूर्ण पश्चिम आणि मध्य भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज हवामान खात्याकडून सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात पाउस?
बंगालच्या उपसागरात तयार होण्या-या कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्चिम व मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाची शक्यते मुळे,महाराष्ट्र राज्यात येत्या 4,5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता.
अधिक माहीतीसाठी IMD वेब साइट कृपया पहा.@RMC_Mumbai @RMC_Nagpur pic.twitter.com/gUKlMAdjGn— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 28, 2021




