माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचं निधन झालं आहे. अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालंय. त्या 75 वर्षांच्या होत्या. मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सोमवारी (आज) पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनघा यांच्या पश्चात पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, असा परिवार आहे.




