महाराष्ट्र मुंबई

गृहखात्याऐवजी शिवसेनेला मिळणार ‘हे’ महत्वाचं खातं? एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

मुंबई : एकनाथ शिंदे हे आज आझाद मैदानावरील महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करतील, अशी माहिती आहे. बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा वर्षा बंगल्यावर शिंदेंची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. मात्र, ते गृहमंत्रिपदासाठी आग्रही होते. वारंवार महायुतीच्या नेत्यांच्या बैठका होत होत्या. मात्र, शपथविधीच्या आदल्या दिवशीपर्यंत कोणताच तोडगा निघत नव्हता. याबाबत अजूनही अनेक तर्क-वितर्क लावले जात होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शिंदे गृहमंत्रिपदासाठी ठाम होते. फडणवीसांना कुठलाही तोडगा निघताना दिसत नव्हता, तेव्हा तुमच्या मागण्यांबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून तुम्हाला कळवण्यात येईल, असं फडणवीस म्हणाले. अखेर, शपथविधी काही तासांवर येऊन ठेपल्यानंतर आता एकनाथ शिंदे शपथ ग्रहण करण्यासाठी तयार झाले आहेत. भाजपने शिंदेंना गृहखात्याऐवजी नवी ऑफर देत महसूल खातं शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर एकनाथ शिंदेंनीही तयारी दर्शवल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेत सकारात्मक चर्चा सुरु असल्याचं दिसत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला गृहखात्याऐवजी इतर काही महत्त्वाची खाती देखील मिळण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना विनंती केली की, तुम्ही मुख्यमंत्री असताना मी उपमुख्यमंत्री झालो. आपण एकत्र निवडणुकीला सामोरे गेलो. अडीच वर्ष एकत्र काम केलं. तुमच्या मागण्यांची दखल घेतली असून त्यावर वरिष्ठांसोबत बोलून तोडगा काढण्यात येईल. तुमच्या मागण्यांवर चर्चा केली जात आहे. तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. त्यामुळे तुम्हीही सरकारमध्ये सामील व्हावं, अशी इच्छा आहे. जर, फक्त मी आणि अजित पवारांनी शपथ घेतली, तर ते योग्य दिसणार नाही. त्यामुळे तुम्हीही शपथ ग्रहण करावी. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची तयारी दाखवली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत