Disney Guruji infected with corona

डिसले गुरुजींना कोरोनाची लागण

महाराष्ट्र

शिक्षक रणजीतसिंह डिसले कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. रणजीत सिंह डिसले यांनी Whats App स्टेटस ठेवून ही माहिती दिली आहे. लक्षणे दिसत असल्याने मी कोविड टेस्ट करुन घेतली आहे. ती पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन डिसले सरांनी केलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नुकतीच त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मुंबईहून बार्शीला परतल्यानंतर डिसलेसरांना थकवा व काही लक्षणे जाणवू लागली. त्यांच्या पत्नीला त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातून त्यांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. इतर कुटुंबीयांची चाचणी निगेटिव्ह आली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत