Fire
धुळे महाराष्ट्र

मोठी बातमी : धुळ्यात मेणबत्तीच्या कारखान्यात भीषण आग, चार महिलांचा मृत्यू

धुळे : धुळे जिल्ह्यातील चिपलीपाडा शिवार येथील मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत चार महिलांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेत दोन महिला गंभीररित्या भाजल्या असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर गावाजवळ असलेल्या चिपलीपाडा शिवार येथील मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्यात भीषण आग लागली. या आगीत चार महिलांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आशाबाई भैया भागवत (वय ३५ वर्ष) आणि राजश्री भैया भागवत (वय १५ वर्ष), नयना संजय माळी, सिंधुबाई धुडकू राजपूत या चौघींचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. मृत मजूर हे जैताने येथील रहिवाशी असल्याचे समजते. जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितलं की आगीच नेमकं कारण चौकशीत समोर येईल. या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत