big news for home buyers

घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; सरकारकडून मुद्रांक शुल्कात सवलत

नागपूर महाराष्ट्र

पुणे : मालमत्ता खरेदीवरील मुद्रांक शुल्कात 31 मार्च 2021 पर्यंत सवलत देण्यात आलीय. 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्कात 1.5 टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे त्याचा हजारो मालमत्ता खरेदीदारांना फायदा होणार आहे. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क सवलत दिलीय. तत्पूर्वी 3 टक्के मुद्रांक शुल्क सवलत 31 डिसेंबर 2020 पर्यंत मर्यादित आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोरोनाच्या संकटात बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने 1 सप्टेंबरपासून 6 टक्के असलेल्या मुद्रांक शुल्कात 3 टक्क्यांपर्यंत कपात केली होती. मुद्रांक शुल्क कमी होताच शहर आणि ग्रामीण भागात दस्त नोंदणी (रजिस्ट्री) वाढल्या होत्या, पण गेल्या वर्षीच्या याच महिन्यांच्या तुलनेत शासनाला महसूल कमी मिळाला. 3 टक्क्यांची सवलत 31 डिसेंबर 2020 पर्यंत राहणार आहे. मुद्रांक शुल्क सवलतीमुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळालीय.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत