Remedesivir injection - Dr. Sujay Vikhe
अहिल्यानगर कोरोना महाराष्ट्र

डॉ. सुजय विखे यांचं कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी आणखी एक मोठं पाऊल

अहमदनगर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण पडत आहे. ऑक्सिजन अभावी होणाऱ्या मृत्यूच्या घटनादेखील मन सुन्न करणाऱ्या आहेत. अशातच आता ऑक्सिजनची निर्माण होणारी समस्या काही अंशी कमी करण्यासाठी विखे पाटील परिवाराने पाऊल उचलले आहे. सुमारे दिड कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे नगरमध्ये कोरोना विरोधात लढ्याला मोठी मदत होणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

डॉ. सुजय विखे यांनी आणलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मुद्यावर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले कि, “रेमडेसिवीरबद्दल आता मी काही बोलणार नाही. मी ही इंजेक्शन आणल्यावर त्याचे काय झाले ते तुम्हाला माहिती आहे. आता ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन त्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. आम्ही विखे कुटुंबियांनीच आता हा प्लांट उभारण्याचे ठरविले आहे. त्यासाठी कंपनीशी करार झाला, पैसेही भरले. दोन-तीन दिवसांत चीनहून कंपनीचे साहित्य येईल. जगातील प्रसिद्ध कंपनीची अत्याधुनिक सामुग्री असून कमी दिवसात ती जोडली जाते. त्यामुळे येत्या दहा दिवसांत विळद घाटातील आमच्या हॉस्पिटलमध्ये हा प्रकल्प सुरू होईल.”

पुढे बोलताना ते म्हणाले कि, “इंजेक्शनपेक्षा ऑक्सिजन महत्वाचा असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या ऑक्सिजन उपलब्धतेवर भर दिला आहे. त्यामुळे भाजपचा खासदार या नात्याने यासाठी हातभार लावण्याचे समाधान मला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. भारतात प्रथमच असा जलद सुरू होणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यातून आमच्या हॉस्पिटलची गरज भागवून उरलेला ऑक्सिजन जिल्हा सरकारी रुग्णालयाला दिला जाणार आहे.”

अहमदनगरमधील ऑक्सिजनची कमतरता पाहून सुजय विखे यांनी तब्बल दीड कोटी रुपयांचा ऑक्सिजन प्लांट उभारण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे अत्यंत कमी काळात म्हणजेच येत्या 10 दिवसांत हा प्लांट कार्यान्वित होणार आहे. तसेच हा फ्लांट भारतातील पहिला आटोमॅटिक ऑक्सिजन जनरेट करणारा प्लांट असणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत