नंदुरबार : दोन दुचाकींची धडक झाल्यानंतर मागून येणाऱ्या कंटेनरने दुचारीस्वारांना चिरडल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा – सारंगखेड्या रत्यावर ही घटना घडली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील अनदर बारीजवळील उमीया या हॉटेल जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. नेमका याचवेळी मागून कंटेनर आला, या कंटेनरने दुचाकीवरील दोघांना चिरडले. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले, तर दुचाकीवरील अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात ठार झालेले दोघेही मध्यप्रदेशातील रहिवाशी असून शिरपुर येथून ते त्यांच्या गावी जात होते. सारंगखेडा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.




