मुंबई : राज्यातल्या पूरग्रस्त आणि अतिवृष्टी बाधितांसाठी राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली. त्यानुसार अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना १० हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.
राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात अतिवृष्टी आणि पूरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेतीपिकांचं नुकसान झालं. त्यामुळे नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले.
- जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर
- बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर
- बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर
- ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.
राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले.#MahaCabinetDecision
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 13, 2021




