Satara khambataki ghat Car burn

खंबाटकी घाटात कार जळून खाक; मोठा अनर्थ टळला

महाराष्ट्र

सातारा : मुंबईहून वाईला जाणाऱ्या कारने सातारा येथील खंबाटकी घाट उतरत असतानाच अचानक पेट घेतला आणि आगीचा भडका उडून काही क्षणांत कार जळून खाक झाली. कारमधील दोघेजण वेळीच कारमधून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

इंजिन जास्त गरम झाल्याने शॉर्ट सर्किट होवून ही आग लागल्याचा प्राथमिक व्यक्त केला जात अंदाज आहे. वेळे गावातील लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घाटातील संपूर्ण वाहतूक थांबवली. किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक बंबाने ही आग आटोक्यात आणली.या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत