Famous singer Diljan dies in a tragic accident

प्रसिद्ध गायक दिलजान याचा भीषण अपघातात मृत्यू

मनोरंजन

प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजान याचे अपघातात निधन झाले. तो ३१ वर्षांचा होता. दिलजान अमृतसरहून करतारपूरकडे येत असताना जंडियाला गुरु येथे मंगळवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसर-जालंधर जीटी रोडवरील जंडियाला गुरु पुलाजवळ दिलजानची कार पार्क केलेल्या एका ट्रकला आदळली. त्यावेळी दिलजान गाडीत एकटा होता. त्याच्या कारचा वेग खूप जास्त होता. त्याची कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकला आदळली. अपघातानंतर दिलजानला तात्काळ जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

दिलजनाचे वडील मदन मदार यांनी सांगितले की, “दिलजानाचे नवीन गाणे 2 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. सोमवारी तो या संदर्भातील बैठकीसाठी आपल्या कारमधून अमृतसरला गेला होता. रात्री उशिरा परतत असताना हा अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत