Maharashtra SSC Result 2021 will be announced today

दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता

शैक्षणिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांचा दहावीचा निकाल आज (१६ जुलै) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करत मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल http://result.mh-ssc.ac.in तसेच मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर आज दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत २०२१ मध्ये दहावीसाठी राज्यभरातून १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये नऊ लाख नऊ हजार ९३१ विद्यार्थी, तर सात लाख ४८ हजार ६९३ विद्यार्थिनींचा समावेश आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत