प्रयागराजमधील गंगापार येथे शनिवारी सकाळी एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली. थरवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवराजपूर गावात एकाच कुटुंबातील ५ जणांवर दगड- विटा आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला, आणि या सर्वांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर घराला आग लावण्यात आली. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. या घटनेची माहिती प्रदीप यादव यांनी पोलिसांना दिली. त्यांची वहिनी व इतरांची कोणीतरी हत्या केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मृतांमध्ये ५५ वर्षीय शेतकरी राजकुमार यादव, त्यांची पत्नी 50 वर्षीय कुसुम, 25 वर्षीय मुलगी मनीषा, 30 वर्षीय सून सविता आणि दोन वर्षांची नात साक्षी यांचीही हत्या करण्यात आली आहे.
एडीजी प्रयागराज झोन प्रेम प्रकाश यांनी सांगितले की, सुरुवातीच्या तपासावरून असे दिसते आहे की, दरोडेखोरांनी ही घटना लुटण्याच्या उद्देशाने केली आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी घराला आग लावल्याचे समजते. पोलीस प्रत्येक पैलूंचा बारकाईने तपास करत आहेत. फॉरेन्सिक आणि श्वानपथक तपासासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.
बसपा प्रमुख मायावती यांनी या घटनेचा निषेध केला असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
उत्तर प्रदेश के प्रयागराज में एक ही परिवार के पांच लोगों की निर्मम हत्या किए जाने की खबर अति-दुःखद, निन्दनीय व चिन्ताजनक। सरकार घटना की तह में जाकर दोषियों के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई सुनिश्चित करे।
— Mayawati (@Mayawati) April 23, 2022




