प्रयागराजमधील गंगापार येथे शनिवारी सकाळी एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली. थरवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवराजपूर गावात एकाच कुटुंबातील ५ जणांवर दगड- विटा आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला, आणि या सर्वांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर घराला आग लावण्यात आली. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि […]

