Famous Writer Novelist Bharat Kale
कोरोना छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

प्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार भारत काळे यांचे कोरोनाने निधन

औरंगाबाद : प्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार भारत काळे यांचे रविवारी दुपारी चारच्या सुमारास करोनाने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. गेल्या पंधरा दिवसांपासून ते करोनाने आजारी होते. औरंगाबाद येथे उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भारत काळे हे मराठीतील प्रसिद्ध लेखक होते तसेच ते बाराशिव शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी येथे कार्यरत होते. ‘ऐसे कुणबी भूपाळ’, ‘दीक्षा’ ही पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. काळे यांच्या निधनाने सर्व मित्र, परिचित आणि साहित्य वर्तुळातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.भारत काळे हे काळाचा वेध घेऊन लेखन करणारे कादंबरीकार आहेत. त्यांनी केलेली मानसशास्त्रीय अंगाची मांडणी ही त्यांच्यातल्या वेगळेपणाची ओळख करून देणारी आहे. त्यांनी मानवी मनाचे अनेक धागे वाचकांच्या‍ समोर आपल्या साहित्यातून मांडले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत