औरंगाबाद : प्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार भारत काळे यांचे रविवारी दुपारी चारच्या सुमारास करोनाने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. गेल्या पंधरा दिवसांपासून ते करोनाने आजारी होते. औरंगाबाद येथे उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भारत काळे हे मराठीतील प्रसिद्ध लेखक होते तसेच ते बाराशिव शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी येथे कार्यरत होते. ‘ऐसे कुणबी भूपाळ’, […]

