बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याना अस्वस्थता आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्याना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर नॉन कोविड कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.
संजय दत्तला करोना सदृश्य लक्षणं जाणवल्यानं तातडीनं रॅपिड अॅण्टीजेन चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर आरटी-पीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला असून, या चाचणी रिपोर्ट अजून आलेला नाही.
काही चाचण्यांचे रिपोर्ट अजून प्रलंबित असून, डॉक्टरांनी तपासणी करून उपचार सुरू केले आहेत. “संजय दत्त याची प्रकृती स्थिर असून, नॉन कोविड रुग्णांसाठी ठरवून देण्यात आलेल्या नियमावलीनुसार उपचार केले जात आहेत,” अशी माहिती लिलावती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवीशंकर यांनी सांगितलं.