Accident of Gopichand Padalkar's brother's car
महाराष्ट्र राजकारण

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावाच्या गाडीला भीषण अपघात, गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल

सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू आणि सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ब्रम्हानंद पडळकरांसह तिघेजण गंभीर जखमी आहेत. तसेच छोटा हत्तीचा चालकही गंभीर जखमी आहे. जखमींना विटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू […]

Congress state spokesperson Gopaldada Tiwari
महाराष्ट्र राजकारण

पवारांच्या घरावरील भ्याड व चिथावणीखोर हल्ल्याचा तीव्र धिकाःर – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी सुवर्ण-मध्य काढण्याची भूमिका घेतल्यामुळे या आंदोलनाच्या निमित्ताने अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याची संधी हातची गेली, या भावनेने काही राजकीय पक्षांचा भ्रम निरास झाल्यामुळेच हा चिथावणीखोर हल्ला झाला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे जाहीर निषेध व […]

mumbai police arrested st employees unions advocate gunaratna sadavarte
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मोठी बातमी : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक, दीड तासाच्या चौकशीनंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई :  एसटी कर्मचाऱ्यांनी आज दुपारच्या सुमारास शरद पवारांच्या सिल्वर ओक या घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 104 कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना आठ वाजेच्या सुमारास परळ येथील त्यांच्या घरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि […]

Anil Deshmukh arrested by CBI in corruption case
महाराष्ट्र मुंबई राजकारण

अनिल देशमुख यांची 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी

मुंबई : विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. आज कोर्टात सीबीआयचे वकील आणि अनिल देशमुख यांच्या वकिलांमध्ये जोरदार वादावादी झाली. भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीत सीबीआयने आज अनिल देशमुखला मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले. आता न्यायालयाने त्यांची सीबीआय कोठडीत रवानगी केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी […]

Anil Deshmukh arrested by CBI in corruption case
महाराष्ट्र मुंबई राजकारण

ब्रेकिंग! अनिल देशमुख यांना CBI ने केली अटक

मुंबई : सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली आहे. दरम्यान, CBI कोठडी टाळण्यासाठी अनिल देशमुख रुग्णालयात दाखल झाले, असा दावा तपास यंत्रणेने केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला होता. कथित १०० कोटींच्या वसुली प्रकरणासंदर्भात देशमुख यांच्या कोठडीची मागणी करणाऱ्या सीबीआयच्या अर्जाला विशेष सीबीआय […]

sanjay raut
महाराष्ट्र मुंबई राजकारण

तर मी संपत्ती भाजपाला दान करेल… ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया…

मुंबई : ईडीने मोठी कारवाई करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दोन शब्दांचं ट्विट करत ते म्हणाले की असत्यमेव जयते!! त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की मी कष्टाने कमावलेली ईडीने संपत्ती जप्त केली आहे. त्यानंतर ते म्हणाले की […]

Sanjay Raut will be admitted to Lilavati Hospital today
महाराष्ट्र मुंबई राजकारण

ब्रेकिंग! संजय राऊत यांच्यावर मोठी कारवाई, ईडीकडून मालमत्ता जप्त…

मुंबई : ईडीने मोठी कारवाई करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या मुलीचं लग्न झालं होतं. त्यानंतर ईडीकडून त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 1,034 कोटी रुपयांच्या […]

महाराष्ट्र मुंबई राजकारण

प्रवीण दरेकरांची ४ तास चौकशी, पोलिसांवर राज्य सरकारचा प्रचंड दबाव, नियमबाह्य प्रश्न विचारले, दरेकरांचा आरोप…

मुंबई : मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची आज मुंबईतील रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. यादरम्यान त्यांना विविध प्रश्न विचारले. चौकशी संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी चौकशीचा तपशील सांगितला तसंच सरकारचा पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा आरोप केला. चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मी सगळी उत्तरं दिली. पोलिसांनी […]

housing minister Jitendra Awhad
महाराष्ट्र मुंबई राजकारण

जितेंद्र आव्हाड यांनी केला मोठा खुलासा, आमदारांना ‘ती’ घरे मोफत देण्यात येणार नसून…

मुंबई : राज्यातील आमदारांसाठी मुंबईत ३०० घरे बांधण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आल्यानंतर कालपासून सरकारवर जोरदार टीका होत आहे. त्यातच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आमदारांना ही घरे मोफत दिली जाणार नसून त्यांच्याकडून पैसे घेण्यात येणार आहेत, असा खुलासा त्यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत सांगितले […]

Social media being abused to hack our democracy, says Congress president Sonia Gandhi in Lok Sabha
देश राजकारण

लोकशाहीला हॅक करण्यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर केला जातोय – सोनिया गांधी

नवी दिल्ली : बुधवारी लोकसभेत बोलताना काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘आपल्या लोकशाहीला हॅक करण्यासाठी’ सोशल मीडियाचा गैरवापर केला जात आहे. फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतात राजकीय कथा मांडण्यासाठी फेरफार केला जात आहे. सोनिया गांधी म्हणाल्या कि, “फेसबुक आणि ट्विटर सारख्या जागतिक कंपन्यांचा वापर नेते, पक्ष आणि त्यांच्या प्रॉक्सीद्वारे राजकीय कथन […]