मुंबई : मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीच्या उत्पादीत ऑटोरिक्षा/टॅक्सी मीटरची विक्री व वितरण तात्काळ थांबविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. पुण्याच्या या कंपनीद्वारे केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नमुन्यामध्ये (मॉडेल अप्रुव्हल) ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने फेरबदल करण्यात आल्यासंदर्भातील याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनी, पुणे यांनी त्यांनी Model Approval No.-IND/०९/०६/१६३ […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’
नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती आयोजकाकडून देण्यात आली. 11 फेब्रुवारी रोजी दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदनात हा पुरस्कार प्रदान समारंभ होईल. ५ […]
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे : पनवेल एक्झिट मार्ग ११ फेब्रुवारीपासून सहा महिने राहणार बंद
पनवेल : पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एक्झिट रोड ११ फेब्रुवारीपासून सहा महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वापरणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासात मोठा बदल करावा लागेल. कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पांतर्गत कळंबोली सर्कल येथे कन्स्ट्रक्शन कामामुळे हे बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या ठिकाणी नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास बांधण्याची […]
पुणे : ट्रेकरचा तोरणा किल्ल्यावर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
राजगड : शनिवारी रात्री उशिरा राजगड (वेल्हे) तालुक्यातील तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंग करत असताना एका ४४ वर्षीय ट्रेकरचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मृताचे नाव रणजित मोहनदास शिंदे असे आहे. तो मूळचा सातारा जिल्ह्यातील सोनगावचा रहिवासी होता आणि पुण्यातील वारजे येथे राहत होता. शिंदे हे त्यांचे मित्र फजिलत खान यांच्यासोबत किल्ल्यावर गेले होते. पोलिस सूत्रांनी दिलेल्या […]
विकृतीचा कळस! २ तासांत १७ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग, शाळेजवळील स्टेशनरीच्या दुकानात धक्कादायक प्रकार
नागपूर : एका विकृत व्यक्तीने एका खासगी शाळेतील सुमारे १७ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांमध्येही अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खाजगी शाळा आहे. शाळेजवळ स्टेशनरीचे […]
भीषण अपघात! पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या मिनीबसला कंटेनरची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू, १५ जण जखमी
सोलापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या मिनीबसला कंटेनरची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला आहे. मोहोळ तालुक्यातील कोळेगाव पाटीजवळ ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात कंटेनर चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनरची थेट मिनीबसला धडक बसली. यावेळी कंटेनर व दुचाकीचा अपघात झाला आणि कंटेनर राॅन्गसाइडला जाऊन एका […]
‘एआय’ क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या ‘स्टार्टअप्स’ना सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : सायबर क्राईमचे जग वेगाने बदलत आहे. सायबर गुन्हेगाराकडून एआयचा वापर करून सामान्य माणसाला भुरळ घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सायबर युद्ध रोखायचे असल्यास तंत्रज्ञानानेच सक्षमपणे उत्तर देण्याची गरज आहे. भविष्याचा वेध घेत एआय क्षेत्रात स्टार्टअप निर्मितीची गरज आहे. एआय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे […]
कर्मचारी हाच एमआयडीसीचा कणा – उद्योगमंत्री उदय सामंत
नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कार्यरत असलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या मुलांनाही भविष्यात आपल्या उद्योगाची पायाभरणी करता आली पाहिजे. विविध उद्योग व्यवसायांना सकारून देण्याचे कसब अंगी असलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना हे बाळकडू घरूनच असल्याने ते यात कमी पडणार नाहीत. यादृष्टीने विचार करून गुणवत्ताधारक पाल्यांना आयपॅड व इतर साहित्य देऊन प्रोत्साहन देण्याची भूमिका उद्योग विभागाने घेतली असे प्रतिपादन […]
‘विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी’साठी १०० एकर जागा देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : विदर्भात विविध उद्योग समूह आकारास येत आहेत या उद्योग समूहांना आवश्यक असलेले तंत्र कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागणार आहे. भविष्यातील रोजगाराची ही संधी लक्षात घेता स्थानिक युवकांना विविध कौशल्य देणाऱ्या विद्यापीठाची आवश्यकता होती यासाठी साकारणाऱ्या विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटीसाठी शंभर एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. […]
राहुल गांधींना आत्मचिंतनाची गरज, राहुल गांधी यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
नागपूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाराष्ट्रातील मतदारांची आकडेवारी सादर करत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा अधिक मतदान झाल्याचे नमुद केले. राज्यातील मतदार यादीत केवळ पाच महिन्यांत ३९ लाख नवे मतदार समाविष्ट झाले, असा दावा राहुल गांधीनी केला. राहुल गांधींनी महाविकास आघाडीतील खासदार सुप्रिया […]









