पुणे : राज्यात रविवारी अनेक भागांतील तापमानात लक्षणीय घट नोंदली गेली असून, पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नोंदीनुसार, पुण्यातील पाषाण, लोहेगाव आणि शिवाजीनगर या केंद्रांवर कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खाली गेले. IMD चे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितले की, “वरच्या हवामानातील चक्रीवादळाचे अभिसरण […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
बारावीचा यंदाचा निकाल 91.88%, मुलींनी मारली बाजी, निकाल SMS ने देखील पाहता येणार…
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा यंदाचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निकालात १.४९ टक्क्यांची घट झाली आहे. २०२४ मध्ये निकाल ९३.३७% […]
भीषण अपघात! मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बस उलटली, दोन जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी
रायगड : मुंबईहून कोकणात निघालेल्या खासगी प्रवासी बसचा रविवारी रात्री उशिरा रायगड जिल्ह्यातील कर्नाळा खिंडीत भीषण अपघात झाला. या अपघातात सध्या मिळालेल्या माहितीनुसार दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींवर पनवेल आणि कळंबोली येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. […]
‘क्रिएट इन इंडिया’ स्पर्धेतील विजेत्यांचे उद्या सादरीकरण
मुंबई : जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी येथे वेव्हज् 2025 या आंतरराष्ट्रीय दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत उद्या ४ मे रोजी ‘ क्रिएट इन इंडिया’ या स्पर्धेतील विजेत्यांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या परिषदेत मास्टरक्लास सत्रात सकाळी 10 ते दुपारी 1.30 पर्यंत क्रीटोस्फीअर स्टेज, […]
उदंचन जलविद्युत प्रकल्प : राज्य ऊर्जा निर्मितीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने अग्रेसर
मुंबई : राज्य ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पांमधून ऊर्जा निर्मितीसाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. हरित ऊर्जा निर्मितीसह राज्याला ऊर्जा संपन्न बनविण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जलसंपदा विभाग, महाजेनको, महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि अवादा अॅक्वा बॅटरीज प्रा. लि. या कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या तीन खंडाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या ७, ८ आणि ९ या तीन खंडासह इंग्रजी खंड चारचे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड दोनच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड ७, ८, ९ ची निर्मिती करण्यात आली आहे. कॅबिनेट हॉलमध्ये […]
नवले ब्रिजजवळ वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेतले, गुन्हा दाखल
पुणे : सिंहगड रोड पोलिसांनी मुंबई-बेंगळुरू बायपासवरील नवले ब्रिज परिसरात वेश्याव्यवसायात सहभागी असलेल्या तीन महिलांविरुद्ध अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कॉन्स्टेबल ज्योती हुलावले यांनी तक्रार दाखल केली, ज्याच्या आधारे तिन्ही महिलांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या महिला नवले ब्रिजजवळ थांबायच्या आणि पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांकडे बघून […]
पीकविमा योजना ते इलेक्ट्रिक वाहन धोरण, मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ ११ मोठे निर्णय
मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील विविध विभागांनी आगामी काळात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्वाचे निर्णय घेतले आहेत. जलसंपदा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम, कृषी, परिवहन आणि समाजकल्याण विभागांचे हे निर्णय भविष्यातील धोरणात्मक दिशादर्शक ठरतील. मंत्रिमंडळ बैठकीतील ११ प्रमुख निर्णय 1. टेमघर […]
सोलापुरात आणखी एका डॉक्टरची आत्महत्या, बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
सोलापूर : सोलापुरात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेल्या एका डॉक्टराने स्वतःचा गळा कापून आत्महत्या केली आहे. आदित्य नांबीयार असे आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे. तो सध्या सोलापुरात राहत होता, तर मूळचा मुंबईचा असल्याची माहिती मिळाली आहे. आदित्यने अलीकडेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते.अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. आदित्यने सोलापूर शहरातील डॉ व्ही एम वैशंपायन […]
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर सदर कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पीडित कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या […]









