मुंबई : कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मुख्य सचिवांना एका पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रात संसर्ग कमी होत असला तरी काही जिल्ह्यांत पॉझिटीव्हिटी दर आणि कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्राने ही सूचना केली आहे. राज्य शासनाने […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरे झोपडपट्टीमुक्त करण्याचा प्रयत्न
पुणे : झोपडपट्टीधारकांना हक्काचे व मालकीचे घर मिळाले पाहिजे, त्यांना सन्मानाने जीवन जगता आले पाहिजे. पुणे व पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त झाले पाहिजे, या करिता येत्या काळात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या […]
अनिल परब यांना ईडीची नोटीस, भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत असल्याची संजय राऊत यांची प्रतिक्रिया
मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यांना 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात समन्स बजावल्याची माहिती मिळाली आहे. ईडीने अनिल परब यांना मंगळवारी (३१ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता ईडीच्या मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. संजय राऊत यांनी याबाबत ट्वीट करत म्हटले कि केंद्र सरकारने सूडबुद्धीने […]
राज्यात पुन्हा पावसाचे आगमन, पुढील चार-पाच दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता राज्यात पुढील चार-पाच दिवस अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवसांसाठी भारतीय हवामान खात्याकडून बऱ्याच जिल्ह्यांना हाय अलर्ट जरी करण्यात आले आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने संपूर्ण पश्चिम आणि मध्य भारतात पावसाची […]
राज्यातील अतिवृष्टीबाधितांना दिलासा, २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय
मुंबई : राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे. राज्यात जुलै 2021 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईची रक्कम वाढवण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तथापी, अद्यापही केंद्र शासनाने 2015 नंतर […]
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचेच एकमत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा अभ्यास करून येत्या शुक्रवारी यावर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी बैठक घेऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. बैठकीत प्रास्ताविक करताना मंत्री भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासंबंधात शासकीय पातळीवर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. […]
यंदाही गणेशोत्सव साधेपणाने, कडक निर्बंध पाळूनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेश
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सवही साधेपणाने साजरा होणार आहे. मुंबई महापालिकेने गणेश मंडळांसाठी कडक निर्बंध पाळूनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेश काढले आहेत. मुंबई महापालिकेने 16 टक्के गणेश मंडळांना सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्याची परवानगी दिली आहे. कोरोना संसर्गाच्या अगोदर 3000 पेक्षाही अधिक मंडळं मंडप उभे करण्यासाठी परवानगी मागायचे. यावर्षी एकूण 1273 मंडळांनी मंडप उभे […]
पायलटला विमानातच सुरू झाला हृदयविकाराचा त्रास, मग…
नागपूर : पायलटला विमानातच हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्याने बांगलादेशच्या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग करण्यात आले. या विमानात एकूण १२६ प्रवासी होते. मस्कतहून ढाक्याला जाणारे हे विमान रायपूरवरुन जात असताना पायलटला हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला, त्यामुळे विमानाने कोलकाता एटीसीला संपर्क करून विमानातील परिस्थितीबद्दल सांगितले. त्यानंतर एटीसीने विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग करण्याचे आदेश दिले. मिळालेल्या […]
एकनाथ खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून एकनाथ खडसे यांची जळगाव आणि लोणावळा येथील 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची गेल्या काही दिवसांपासून चौकशी ईडीकडून सुरु आहे. 2016 मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे […]
केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. ते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेल्याची माहिती मिळाली आहे. राणे उद्यापासून त्यांची जन आशिर्वाद यात्रा पुन्हा सुरु करणार आहेत. मात्र त्यापूर्वी नारायण राणे रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. २ दिवसांपूर्वी नारायण राणे यांना झालेल्या अटकेच्या कारवाईदरम्यान त्यांचा रक्तदाब वाढला होता. याशिवाय त्यांना मधुमेहाचाही त्रास आहे. […]










