सातारा : मांघर येथील ‘मधाचे गाव’ प्रकल्प हा अशा प्रकारचा देशातील पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यातदेखील असे प्रकल्प राबवण्यात येतील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे ‘मधाचे गाव’ म्हणून देसाई यांच्या उपस्थितीत आज घोषित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. उद्योगमंत्री देसाई म्हणाले, ग्रामीण अर्थव्यवस्थेत मधमाशी पालनाद्वारे रोजगाराच्या संधी […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
धक्कादायक! धारावीत 19 वर्षीय विवाहितेवर चाकूचा धाक दाखवत सामूहिक बलात्कार
मुंबई : एका 19 वर्षीय विवाहित महिलेवर 2 आरोपींनी चाकूचा धाक दाखवत पहाटे तिच्याच घरात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील धारावी परिसरात ही घटना घडली. पीडितेने सांगितले की, 2 आरोपींनी चाकूचा धाक दाखवत तिला धमकावले आणि तिच्यावर अत्याचार केले. ओळख लपविण्यासाठी आरोपींनी चेहरे झाकलेले होते आणि आरोपींनी या संपूर्ण कृत्याचा व्हिडिओही बनवला […]
कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली टिश्यू कल्चर लॅबची पाहणी
पुणे : कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज मांजरी येथील केएफ बायोप्लॅन्टस समूहाच्या टिश्यूकल्चर लॅबची पाहणी केली. राज्यातील शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानावर आधारित शेतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी केएफ बायोप्लॅन्ट समूहाच्या मदतीने काय करता येईल, यासंदर्भातही त्यांनी चर्चा केली. भुसे यांनी टिश्यूकल्चर लॅब, उत्पादन केंद्र, ग्रीन हाऊस तसेच डमो हाऊसची पाहणी केली. फुले किती दिवस टिकू शकतात, उत्पादन, फुलांचे […]
कोयना प्रकल्पग्रस्तांना सातबाराचे वितरण, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न
सातारा : प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून, संघर्षातून आणि कष्टातून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाची निर्मिती झाली आहे. प्रकल्पग्रस्तांनी केलेला त्याग व संघर्ष कधीही विसरता येणार नाही, त्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोयनानगर येथे कोयना प्रकल्पग्रस्तांना सातबारा वितरणाच्या वेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, प्रकल्पग्रस्तांनी […]
अंदमानच्या समुद्रात आज मान्सून दाखल, राज्यातील ‘या’ 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
पुणे : मान्सून अंदमानच्या समुद्रात आज येऊन धडकल्याचे हवामान खात्याने सांगितले. तसेच कोकण किनारपट्टीबरोबरच राज्यात 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढच्या 2 दिवसामध्ये केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. #SWMonsoon2022 Good news: SW Monsoon today 16 May; arrived over […]
PUB-G खेळताना 16 वर्षांचा मुलगा इमारतीवरून पडला, मोबाइल गेमचा विळखा…
पालघर : पबजी खेळताना १६ वर्षांचा मुलगा इमारतीवरून पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शादान शेख असे या मुलाचे नाव आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना काल (१५ मे) पालघरच्या शिरगाव येथे घडली. शादान शेख हा […]
लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारेंची आंदोलनाची घोषणा, मुख्यमंत्र्यांवर केला ‘हा’ आरोप
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलनाची घोषणा केली आहे. यासंबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना अण्णा म्हणाले कि, “अडीच वर्षांपूर्वी लोकायुक्त कायदा करू, असे लेखी आश्वासन देणारे मुख्यमंत्री आता याविषयी बोलतही नाहीत. याचा अर्थ यामागे नक्कीच काही तरी घडलंय’, असा आरोपही यावेळी अण्णांनी केला. राज्यात लोकायुक्त कायदा करावा या मागणीसाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन […]
केतकी चितळे न्यायालयात म्हणाली, मी ‘ती’ पोस्ट डिलीट करणार नाही…
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकी चितळे हिला रविवारी सकाळी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी केतकी चितळे न्यायालयात म्हणाली की मी पोस्ट डिलीट करणार नाही. न्यायालयाने केतकी चितळे हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी […]
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक
नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी १० जून २०२२ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे. भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार सर्वश्री पियुष गोयल, पी. चिदंबरम, प्रफुल्ल पटेल, डॉ. विकास महात्मे, […]
चिमुकली आईस्क्रीम घेण्यासाठी घराबाहेर गेली… आणि नराधमाने डाव साधला…
मुंबई : आईस्क्रीम घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या आठ वर्षीय मुलीवर एका तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील आग्रीपाडा परिसरात शुक्रवारी घडली. आग्रीपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली. 38 वर्षीय आरोपीचा अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा इतिहास असून यापूर्वीच त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग्रीपाडा परिसरात आजीसोबत राहणारी आठ वर्षांची पीडित मुलगी […]










