नाशिक : कोविड 19 साथीच्या आजाराने भारतालाच नव्हे तर जगाला हे दाखवून दिले आहे की आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अजून प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारतातील आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज असणे हे अति आवश्यक असल्याने यासाठी पंतप्रधान आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात व केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मंडविया यांच्या […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
ठाणे, बृहन्मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, पालघर येथील नागरी संरक्षण स्वयंसेवक आपत्कालीन कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज
मुंबई : मुंबई शहरातील नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांना नागरी संरक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्य बजावण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच दिनांक 18 जुलै 2022 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या प्रशिक्षण केंद्रामार्फत 200 नागरी संरक्षण स्वयंसेवकांना आपत्ती निवारणाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. नागरी संरक्षण दलाच्या ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, पालघर, जिल्हा […]
अतिवृष्टीग्रस्त भागातील 14 हजार 480 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
मुंबई : राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व २९९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नगरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अंशत: नुकसान […]
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गेल्या महिन्यात लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर अनेक नेते मंडळी आणि निकटवर्तियांना राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यातच आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी देखील राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थावर त्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज […]
नोकरीची संधी! पुणे महानगरपालिकेने 448 पदे भरण्यासाठी मागवले ऑनलाइन अर्ज
पुणे : पुणे महानगरपालिकेने (PMC) विविध विभागांमधील एकूण 448 पदे भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. पुणे महानगरपालिका, PMC भरती 2022 अधिसूचना सहाय्यक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (JE), आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे. PMC भर्ती 2022 अर्ज प्रक्रिया IBPS– ibps.in च्या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे. PMC अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज […]
सुमारे 117.14 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एका व्यक्तीस अटक
मुंबई : खोटी खरेदीची बिजके प्राप्त करून शासनाची करोडो रुपयांची महसूलहानी करणाऱ्या करदाता मे पाकीजा स्टिल एलएलपी चे भागीदार आणि मे मायल स्टिल प्रा.लि. चे संचालक सय्यद तैकीर हसन रिजवी यांनी या प्रकरणामध्ये वस्तूंच्या वा सेवांच्या पुरवठ्याशिवाय ९९.२७ कोटी रुपयांची बनावट बीजके प्राप्त करुन १७.८७ कोटी रुपयांची बनावट वजावट मिळविल्याप्रकरणी सय्यद तैकीर हसन रिजवी या […]
पुणे शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद
पुणे : उद्या पुण्यातील बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उद्या (२1 जुलै) तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत, त्यामुळे पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (२२ जुलै) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. शहरातील पाणीपुरवठा बंद असणारा भाग वडगाव जलकेंद्र […]
ठाणेकरांना मोठा दिलासा! 1 ऑगस्टपासून ठाणेकरांना मिळणार 50 एमएलडी अतिरिक्त पाण्याचा लाभ
मुंबई : 1 ऑगस्ट पासून ठाणे शहरातील नागरिकांना 50 एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याला राज्याच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे विस्तारित ठाणे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाला ठाणे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा […]
श्री गुंडी जत्रेनिमित्त राज्यपालांची राजभवनातील देवी मंदिरात आरती
मुंबई : कोरोनामुळे दोन वर्षांच्या अवकाशानंतर यंदा होत असलेल्या राजभवनातील प्राचीन श्रीगुंडी देवीच्या यात्रेनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज देवी मंदिरात जाऊन भाविकांसमवेत श्री गुंडी देवीची आरती केली. यावेळी दर्शनासाठी विविध भागातून आलेल्या कोळी बांधवांनी पारंपरिक नृत्य केले. अनेक दशकांची परंपरा असलेली ही जत्रा कोरोनामुळे दोन वर्षे झाली नव्हती.
पुणे : मुलीला शाळेत सोडायला जाताना दुचाकीला ट्रकची धडक, अपघातात बाप-लेकीचा मृत्यू
पुणे : पुण्यात सातववाडी भागात दुचाकीला ट्रकनं धडक दिल्यामुळे बाप-लेकीचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. पुणे सासवड रोडवर सकाळी मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना ट्रकच्या धडकेत वडिलांचा मृत्यू झाला. तर उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मुलीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज (१९ जुलै) सकाळी सातच्या सुमारास सातववाडी येथील ग्लायडिंग सेंटर समोर झाला. […]










