पुणे : पुण्यात ड्रग्सची विक्री करणाऱ्या एका परदेशी व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चर्तु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तब्बल 12,38,100 रुपये किंमतीचा 82 ग्रॅम 540 मिलीग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ विक्री करणा-या नायजेरियन व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक चर्तु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना येथील ब्रोमन चौकाकडुन स्पायसर […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत, शिवसेना फुटण्याचे श्रेय त्यांनाच – राज ठाकरे
मुंबई : ”उद्धव ठाकरे यांना संपूर्ण देश जेवढा ओळखत नाही, तेवढा मी चांगल्या प्रकारे ओळखतो. ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. उद्धव बोलतात एक व करतात दुसरेच. शिवसेनेतील फुटीचे श्रेय भाजपला नव्हे, तर स्वतः सेना नेतृत्वाला जात असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. राज ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब […]
शिवसेनेवर कोणाचा अधिकार? 8 ऑगस्टपर्यंत सिद्ध करा…निवडणूक आयोगाची सूचना
मुंबई : निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला नोटीस पाठवली आहे. दोन्ही नेत्यांना शिवसेनेवर अधिकार असल्याच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना बहुमत सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांकडून ८ ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे. शिंदे गटाचा दावा […]
राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस, राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती काय? जाणून घ्या…
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१)-२, पालघर-१, रायगड-महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १२ पथक तैनात आहेत. नांदेड-१, गडचिरोली-१ असे एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या […]
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार 7.50 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज
मुंबई : नवे शैक्षणिक वर्ष 2022-23 आता सुरु होत असून राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्जाची योजना सुरु आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय […]
सलमान खानने घेतली पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट, ‘हे’ आहे कारण…
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने वैयक्तिक संरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळावा यासाठी मुंबई पोलिसांकडे अर्ज सादर केला आहे. अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना सिद्धू मूसवाला प्रमाणे मारू, असे या धमकीत म्हटले होते. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर काही दिवसांनीच सलमान खान आणि सलीम खान […]
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई महानगरपालिकेस प्रत्येकी १० लाख रुपये निधी
मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई जिल्ह्यात या महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येणार आहे. जनसामान्यांचा अधिकाधिक सहभाग मिळण्याच्या हेतूने स्वराज्य महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुंबई शहर व महानगरपालिका यांना प्रत्येकी 10 लाख रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात […]
सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील संस्था, कंपन्यांनी मनुष्यबळाची माहिती 31 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन
मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सर्व संस्था व कंपन्यांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाची माहिती (ER-I) राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या http://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रविंद्र […]
गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधांविना! गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे मिळणार
मुंबई : गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण – उत्सव शांततेत उत्साहात आणि जल्लोषात पार पडावेत यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन व एक खिडकी योजनेंतर्गत देण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यानी तातडीने कार्यवाही […]
मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवांवरील युएसएसडी आता नि:शुल्क
मुंबई : केंद्र सरकारच्या डिजिटल आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट साधण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल बँकिंगच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने युएसएसडी अर्थात असंरचित पूरक सेवा डेटा आधारित मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवा पूर्णपणे नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे भारत राजपत्र 7 एप्रिल 2022 रोजी निर्गमित करण्यात आले आहे. यापूर्वी मोबाईल बँकिंग आणि पेमेंट […]










