औरंगाबाद : राज्यात 17 जिल्ह्यात लंपी स्कीन डिसिज आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे. राज्यात या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जनावरांचे लसीकरण व आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी शासन खंबीर असल्याचेही ते म्हणाले. विभागीय आयुक्तालयात लंपी स्कीन डिसिज आजारासंदर्भात उपाययोजना संदर्भातील बैठक मंत्री विखे […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांकरिता विशेष गौरव पुरस्कार, संबंधितांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन
मुंबई : इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच माजी सैनिकांच्या पाल्यांना 10 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी माजी सैनिकांच्या कुटुंबियांनी 15 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. आयआयटी, […]
क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकन सादर करण्याचे आवाहन
मुंबई : ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आजाद ट्रॉफी (विद्यापीठांकरीता) द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार 2022 च्या पुरस्कारासाठी नाम निर्देशनाचा प्रस्ताव २० सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केंद्र सरकारकडे सादर करण्याचे आवाहन, मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. तसेच या वर्षापासून पात्र खेळाडूंनी पुरस्काराकरिताच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार (Award Guidelines) […]
स्वच्छ व पारदर्शक कारभारसह महसुली उत्पन्न वाढवण्याला प्राधान्य – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये स्वच्छ व पारदर्शक कारभारसह महसुली उत्पन्न वाढवण्याला प्राधान्य राहील, यासाठी विभागातील सर्वांचे सहकार्य लाभेल असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रालयात आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना देसाई बोलत होते. मंत्रालयातील मुख्य इमारतीमधील […]
ऍफ्रो-इंडियन इन्ह्वेस्टमेंट समिट-2022 : मुख्यमंत्र्यांची युगांडाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
मुंबई : युगांडा मध्ये होणाऱ्या ऍफ्रो-इंडियन इन्ह्वेस्टमेंट समिट-2022 चे युगांडाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिले. यासाठी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या शिष्टमंडळात युगांडाचे परराष्ट्र राज्यमंत्री हेन्री ओरेम ओकेलो, भारतातील उच्चायुक्त मार्गारेट क्योजिरे, मुंबईतील वाणिज्य दूत मधुसूदन अग्रवाल, युगांडातील इंडियन असोसिएशचे अध्यक्ष मोहन राव, महासचिव वाहिद मोहम्मद, कंपालातील इंडियन बिझनेस […]
प्रशासनाचे व्हावे सुशासन! सुशासन नियमावलीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
मुंबई : सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेऊन त्यांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरित्या मिळावा यासाठी सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती यांची सांगड घालत सुशासन नियमावली करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आदिवासी विकास, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देऊन अन्य राज्यांना आदर्श ठरेल अशी नियमावली […]
राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या सावधगिरीच्या सूचना
मुंबई : पुढील चार-पाच दिवस हवामान विभागाने राज्यात विशेषतः पश्चिम कोकण आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील होऊ शकते. त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी व कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. कालही ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची […]
ढगफुटीसदृश पावसामुळे बाधित झालेल्यांना तातडीने मदत पुरवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती […]
थेट सरपंचपदांसह 1166 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान
मुंबई : विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. मदान यांनी सांगितले की, संबंधित तहसीलदार 13 […]
राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज, उद्यापासून पावसाचा जोर वाढणार
मुंबई : राज्यात पुढील सात दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 8 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे गणेश विसर्जनावेळी प्रशासनासह भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबई, रत्नागिरी, रायगड, गोंंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाचा अंदाज […]









