मुंबई : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरविषयक हेल्पलाईन लवकरच सुरू करणार आहोत, तसेच सर्व अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील प्रशिक्षणार्थी यांना ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखाच्या मर्यादेत आहे. त्यांना ५०० रूपये विद्यावेतन सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरू करणार असल्याचे उत्तर कौशल्य […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
कोरोना काळात केलेल्या वित्तीय अनियमितता प्रकरणी परभणीचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक निलंबित
मुंबई : परभणी जिल्हा रूग्णालयातील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कोरोना काळात केलेल्या वित्तीय अनियमितेची चौकशी पूर्ण केली आहे. त्यामध्ये ते दोषी आढळल्याने त्यांचे निलंबन केले असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात विधानपरिषदेत केली. याबाबतचा प्रश्न सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना प्रा. डॉ. तानाजी सावंत बोलत होते. मंत्री डॉ. […]
टेलिमेडिसीन ही सुविधा देण्यासाठी ई–संजीवनी योजना – आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत
मुंबई : मे. मायक्रोसॉफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी करार जरी संपुष्टात आला असला तरी आयुष्यमान भारत ई-संजीवनी योजनेतंर्गत टेलिमेडिसीन ही सुविधा रूग्णांना दिली जात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली. अमरावती जिल्ह्यातील हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रातील टेलिमेडिसीन सेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न उपस्थित केला होता, […]
नंदूरबार व पालघर येथे लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
मुंबई : आरोग्यसेवांना बळकटी यावी याकरिता नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी व्हावी यासाठी शासनाकडून अतिदुर्गम भागातही नंदूरबार व पालघर येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे, असे उत्तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिले. नंदूरबार आणि पालघर जिल्ह्यांत विशेषोपचार रूग्णालय सुरू करण्याबाबत विधानपरिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी प्रश्न विचारला होता त्याला उत्तर देताना […]
कारगिल विजय दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते आसामसह अरुणाचल प्रदेशला रुग्णवाहिका भेट
मुंबई : कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी आसाम व अरुणाचल प्रदेश राज्य सैनिक कल्याण मंडळांना प्रत्येकी एक रुग्णवाहिका भेट देण्यात आली. हुतात्मा जवान तसेच माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या अथर्व फाउंडेशनच्या वतीने दोन्ही राज्यांना रुग्णवाहिका भेट देण्यात आली. देशाचे वीर जवान प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करीत असतात. अश्यावेळी […]
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या प्रदानासाठी एनपीएस खाते अनिवार्य
मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. तथापि ९९८२ शिक्षक/शिक्षकेतरांनी त्यांना परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असतानाही, ही योजना अनिवार्य असतानाही एनपीएस खाते उघडलेले नाही, अशांना 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात […]
बी-बियाणे, खत, कीटकनाशक खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून नवीन कायदा आणणार
मुंबई : शेतकऱ्यांची बोगस बि-बियाणे, खत, कीटकनाशक खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी नवीन कायदा लवकरच आणणार आहोत, असे कृषीमंत्री धनजंय मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सांगली जिल्ह्यात बनावट भेसळयुक्त कृषी औषधांची विक्री होत असल्याबाबत सदस्य अरुण लाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्याला उत्तर देताना कृषीमंत्री मुंडे बोलत होते. मंत्री मुंडे म्हणाले, कृषी निविष्ठा विक्री केंद्राची […]
सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी उपाययोजना करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : सन २०१९ च्या पावसाळ्यात जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये कृष्णा खोऱ्यात अति पर्जन्यमानामुळे पूर परिस्थिती उद्भवली होती. सांगली व कोल्हापूर जिल्हे मोठ्या प्रमाणात बाधित झाले. या भागातील पूर नियंत्रणासाठी शासनाने सुचवलेल्या उपाययोजना कामांसाठी जागतिक बँक अर्थसहाय्य करणार आहे. जागतिक बँकेमार्फत तयार करण्यात आलेला प्राथमिक प्रकल्प अहवाल व उपाययोजना कामांचा प्रस्ताव केंद्रीय आर्थिक व्यवहार विभाग […]
कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्याकरिता आणखी किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. शासनामार्फत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून तीन हजार मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात आली असून ही मान्यता प्रत्यक्ष पदभरतीचा कालावधी किंवा ११ महिने यापैकी जो कमी असेल त्याच कालावधीसाठी असेल, असे उपमुख्यमंत्री […]
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रकल्पबाधितांना सदनिका देण्यासंदर्भात लवकरच बैठक – मंत्री उदय सामंत
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पबाधितांना पीएपी (प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल) सदनिका देण्यासंदर्भातील कार्यवाही गतीने सुरु केली जाईल. यामध्ये सहभागी असलेल्या विविध यंत्रणांची समन्वय समिती स्थापन केली जाईल आणि मुंबईतील सर्व लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. सदस्य श्रीमती विद्या ठाकूर यांनी […]






