मुंबई : धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षणासाठी असलेली प्रवेश संख्या वाढविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षणासाठी असलेली ही योजना इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. इतर […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी, आपत्तीपूर्व अंदाज येण्यासाठी शासन नावीन्यपूर्ण संकल्पना राबवीत आहे. कोकणातील सागरी किनारा क्षेत्रात पूर प्रतिबंधक बंधारे बांधणे, दरड कोसळण्यास अटकाव करणे, पूरप्रवण क्षेत्रात उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दरड प्रतिबंधक, धूप […]
ब्रेकिंग! मनोज जरांगे यांचे उपोषण मागे, मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते घेतला ज्यूस
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर 17 व्या दिवशी मागे घेतले आहे. जालना येथील अंतरवाली सराटी गावात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले. मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीदेखील उपस्थित आहेत. मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यंमत्री […]
लिव्ह-इन पार्टनरची हत्या! महिलेला मारल्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून खाडीत फेकला, पत्नीनेही दिली साथ
पालघर : पालघरमध्ये एका व्यक्तीने 28 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेला पाण्यात बुडवून मारले, त्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून गुजरातमधील वलसाड येथील खाडीत फेकून दिला. दरम्यान, या हत्येत आरोपीच्या पत्नीनेही त्याची साथ दिली होती, तिलादेखील पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या […]
नंदुरबार जिल्ह्याच्या याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीला राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान
नवी दिल्ली : हरणखुरी, ता. धडगाव, जि. नंदुरबार येथील याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीला ‘राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्काराने, राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेमध्ये जागतिक अन्न व कृषी संस्था आणि भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत आयोजित ‘कृषी जैवविविधता आणि शेतकरी हक्क’ […]
नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई
मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन करावे, यासाठी उच्चशिक्षण विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अपेक्षित नॅक मूल्यांकन होत नाही. यासाठी विद्यापींठानी पुढाकार घेऊन महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन करून घ्यावे. नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण […]
कवठेमहांकाळ एस.टी. आगारात १८ एस.टी. बसेसचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
सांगली : सामान्य माणसाच्या रोजच्या प्रवासामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महत्त्वाचा घटक आहे. प्रवाशांचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास व्हावा यासाठी कवठेमहांकाळ आगारासाठी नवीन 18 एस.टी.बसेस देण्यात आल्या असून या बसेसचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. कवठेमहांकाळ बसस्थानक येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी खासदार संजय पाटील, तहसिलदार अर्चना कापसे, विभागीय वाहतूक […]
शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत; शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्यसंपन्न पिढी घडविणे ही काळाची गरज असून शिक्षक आणि पालकांनी यासाठी योगदान द्यावे. तसेच विद्यार्थ्यांनी नव्या काळातील आव्हाने ओळखून पारंपरिक विचार न करता नवे आणि आवडीचे क्षेत्र निवडावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. […]
समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी विकास कामांना प्राधान्य – मंत्री छगन भुजबळ
नाशिक : समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सर्व विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. निफाड तालुक्यातील दहेगाव, वाहेगाव व भरवस येथील विविध विकास कामांच्या लोकार्पणप्रसंगी मंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता केशव काळूमाळी, उपअभियंता रवींद्र पुरी, शाखा अभियंता तनुष चव्हाण, […]
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.२५ टक्के दराने परतफेड
मुंबई : महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 च्या अदत्त शिल्लक रकमेची 9.25 टक्के दराने 9 ऑक्टोबरपर्यंत देय असलेल्या व्याजासह सममूल्याने परतफेड करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे. शासकीय विनियमानुसार दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरूपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या […]










