नागपूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ५ डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आणि नागपूरमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपच्या १९ मंत्र्यांनी, शिवसेना शिंदे गटाच्या ११ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत […]
नागपूर
अल्पसंख्याक शाळेतील गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत – अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान
नागपूर : अल्पसंख्याक समाजातील मुलांना योग्य शिक्षण मिळावे, अभ्यासातून त्यांना पुढे येता यावे यासाठी त्यांना त्यांच्या भाषेतून शिक्षण देणे उचित राहील अशा भूमिकेतून शासनाने उर्दू भाषेतील शाळांना मान्यता दिली. यासाठी अनुदानाची व्यवस्था केली. एक व्यापक दृष्टीकोन शासनाने ठेवला. तथापि काही संस्थांनी शासनाच्या या उद्देशाला हरताळ फासल्याचे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी […]
महाराष्ट्र भू-जलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास मान्यता
मुंबई : मच्छिमार बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र भू-जलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या महामंडळाचे मुख्यालय नागपूर येथे राहील. तसेच मत्स्य व्यवसाय मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली या महामंडळाचे कामकाज चालेल. मच्छिमारांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे, मासे टिकवून राहण्यासाठी उपाय सूचविणे तसेच परंपरागत मच्छिमारांच्या हिताचे […]
समृद्धी महामार्गवर भीषण अपघात! खासगी बसची ट्रकला धडक, बसचा चक्काचूर, चालक-वाहकांसह प्रवासी जखमी
बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्सने मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिल्याने दोघे जण गंभीर झाले. जखमींमध्ये बसचालक आणि वाहक यांचा समावेश असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. नागपूर ते मुंबईदरम्यानचा हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आणि वाहन अपघात हे समीकरणच तयार झाले आहे. आजच्या अपघाताने ही दुर्दैवी मालिका कायम असल्याचे चित्र आहे. आज […]
लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज
नागपूर, दि. १७ : नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होत असून यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार असून संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष राहणार आहे. मतदान पथके 18 एप्रिल रोजी सकाळपासून रवाना होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील […]
प्रत्येक मतदाराने मतदान केल्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्त्व नाही – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
नागपूर : सशक्त लोकशाहीमध्ये मतदानाचे पावित्र्य ठेवून प्रत्येक मतदाराने मतदान करणे अत्यावश्यक आहे. याच्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्त्व नाही. नागपूर लोकसभेसाठी मागच्या वेळेस अवघे 54 टक्के मतदान झाले होते हे विसरता कामा नये. याचाच अर्थ 46 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याचे पालन केले नाही. यावेळेस हे चित्र बदलविण्यासाठी सर्व मतदार राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदानाचे प्रमाण 75 […]
सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : पुण्यातील स्पार्कल कँडल तयार करण्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड, पुणे महानगरपालिका या ठिकाणच्या 75 हजार औद्योगिक मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले असून राज्यातील इतरही महानगरपालिकांमध्ये टप्प्याटप्प्याने सर्वेक्षण करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा श्रीमती उमा खापरे यांनी उपस्थित केली होती. यावेळी […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिताबर्डी ते खापरी मेट्रो प्रवास
नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सिताबर्डी ते खापरी असा मेट्रो प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, संचालक अनिल कोकाटे व राजीव त्यागी तसेच सारंग गडकरी यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी मेट्रो रेल्वेकडून असलेल्या अपेक्षा व […]
मोठी बातमी! कर्मचाऱ्यांची आर्थिक, सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे राखली जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
नागपूर : राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले असून मुख्य सचिवांमार्फत त्याबाबतचे मत शासनाला सादर करण्यात येईल. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल, या मूळ तत्वावर शासन ठाम आहे. शासनाला प्राप्त […]
महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेतील अनियमिततेबाबत कारवाई करणार – मंत्री दिलीप वळसे पाटील
नागपूर : राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या हितासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक स्थापन करण्यात आलेली आहे. या बँकेत निवडणुकीनंतर नवीन संचालक मंडळ आले आहे. या संचालक मंडळाने घेतलेले निर्णय तसेच त्यांच्या काळातील कामकाजाची आर्थिक तपासणी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक मुंबई -१ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे सूचना देण्यात आल्या […]










