सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर वेगाने हालचाली घडत आहेत. सीबीआयकडून सुशांत सिंहच्या शवविच्छेदन अहवालाची तपासणी करण्यात येणार असून यासाठी एम्स रुग्णालयाची मदत मागण्यात आली आहे. एम्सकडून पाच डॉक्टरांची टीम गठीत करण्यात आली आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता डॉक्टरांच्या टीमचं नेतृत्त्व करणार आहेत. “हत्येची शक्यता आम्ही पडताळून पाहणार आहोत. मात्र […]
मुंबई
दिलीप कुमार यांच्या लहान भावाचं अस्लम खान यांचं कोरोनामुळे निधन
बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांच्या लहान भावाचं अस्लम खान यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांच्या एहसान खान (९० वर्ष) आणि अस्लम खान(८८ वर्ष) या दोन्ही भावांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या दोघांनाही लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, अस्लम खान […]
प्रसिद्ध चित्रकार राम कामत यांची राहत्या घरी आत्महत्या, मृतदेह बाथटबमध्ये
प्रसिद्ध चित्रकार राम कामत यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली, त्यांचा मृतदेह बाथटबमध्ये सापडला असून त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले की, ‘माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये तसेच त्यांनी काढलेली चित्रं त्यांच्या मित्रांना त्यांची आठवण म्हणून देण्यात यावीत’ राम कामत बुधवारी संध्याकाळी आंघोळ करण्यासाठी गेले. त्यानंतर बराच वेळ झाला तरी ते बाथरूममधून बाहेर आले नाहीत, त्यामुळे […]
सीबीआयमार्फत दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाप्रमाणे सुशांत प्रकरणाचं होणार नाही अशी आशा-शरद पवार
सुप्रीम कोर्टाने काल (19 ऑगस्ट) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचा निकाल दिला. महाराष्ट्र सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं. दरम्यान, शरद पवारांनी याविषयी ट्वीट करुन म्हटलं आहे की, “सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा […]
‘सिल्वर ओक’ मधील ५ जणांना कोरोनाची लागण
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबईमधील निवासस्थान ‘सिल्व्हर ओक’ येथील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सुरक्षारक्षक आणि महिला स्वयंपाकी यांचा समावेश आहे. राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्व्हर ओकमधील दोन लोक आणि सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्यांपैकी तीन लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. संसर्ग झालेले सुरक्षारक्षक बऱ्याचदा लोकांना दूर करण्याचं काम करत असतात, त्यातून त्यांना […]
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनंतर जिम सुरु करण्यासंबंधी राज्य सरकारचा निर्णय
काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जिम सुरु करण्याची मागणी केली होती त्या मागणीची दखल घेत ठाकरे सरकारने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला असून दोन दिवसात अधिकृत घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. “राज्यातील जिम सुरु करावी अशी अनेक दिवसांची मागणी होतीच. […]
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याना अस्वस्थता आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्याना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर नॉन कोविड कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. संजय दत्तला करोना सदृश्य लक्षणं जाणवल्यानं तातडीनं रॅपिड अॅण्टीजेन चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर आरटी-पीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला असून, या चाचणी रिपोर्ट अजून आलेला […]
रेणुका शहाणे यांची अमृता फडणवीस यांच्यावर खरमरीत टीका
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सध्या चांगलंच चर्चिलं जात आहे. या प्रकारात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईविषयी एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली असून अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी चक्क खडेबोल सुनावले आहेत. “सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला […]
मुंबईला पावसाने झोडपलं, वाहतूक ठप्प, कांदिवलीत दरड कोसळली
मुंबई आणि उपनगराला पावसाने झोडपलं आहे. ठिकठिकाणी पाणी साचलं असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांमधील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, मदत व पुनर्वसन विभागाने ही माहिती दिली आहे. आज आणि उद्या मुंबई आणि उपनगरात हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, […]
मुंबई राहण्यासाठी सुरक्षित नसल्याची भावना : अमृता फडणवीस
अमृता फडणवीस यांनी ट्विट केले आहे की, ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळलं जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही. The manner in which #SushantSinghRajputDeathCase is being handled – I feel #Mumbai has lost humanity & is no more safe […]










