मुंबई : शालेय शिक्षण विभागाने राज्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि ११ वीच्या शाळा एप्रिल महिन्यात सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान, आता शिक्षण संचालनालयाने २०२२ ची उन्हाळी सुटी २ मेपासून जाहीर करून नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा १३ जूनपासून सुरू करण्यात याव्यात, अशी विनंती शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. […]
मुंबई
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘ही’ १७ विधेयके संमत
मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांमार्फत दोन्ही सभागृहातील सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न, प्रस्ताव, मागण्यांवर समर्पक चर्चा करण्यात आली. तसेच या अधिवेशनात एकूण 17 विधेयके संमत करण्यात आली असून सर्व विधेयके सविस्तर चर्चा करून शांततेत संमत करण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]
विदर्भ, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही
मुंबई : राज्य शासनाने विदर्भ तसेच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी दिला आहे. राज्यपाल यांच्या निर्देशाप्रमाणे पंचसुत्रीनुसार निधीचे वाटप करण्यात येत आहे. विदर्भ, मराठवाड्यावर महाविकास आघाडी शासन कोणताही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षाच्या विधानसभा नियम 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर […]
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री तुर्तास नाही
मुंबई : राज्यातील सुपर मार्केटमध्ये मद्य (वाईन) विक्रीचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. या निर्णयाबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर मद्य (वाईन) विक्रीबाबत यथायोग्य निर्णय घेण्यात येईल. जनतेला नको असलेले निर्णय लागू करण्याची राज्य सरकारची भूमिका नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. अजित पवार यांनी पुढे सांगितले की राज्यात […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महायुवा ॲप’चे अनावरण
मुंबई : शासकीय योजना, रोजगार संधी आणि पदवीधर तरुण यांच्यादरम्यान दुवा ठरू शकेल अशा ‘महायुवा’ ॲपचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधान भवन समिती सभागृहात अनावरण करण्यात आले. या ॲपवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीत माहिती असेल. पदवीधर या ॲपवर आपले प्रोफाईल तयार करतील. त्यांच्याकडील विशेष प्राविण्य व आवडीचे क्षेत्र याबद्दलची माहिती अपलोड करेल. या आधारे […]
जितेंद्र आव्हाड यांनी केला मोठा खुलासा, आमदारांना ‘ती’ घरे मोफत देण्यात येणार नसून…
मुंबई : राज्यातील आमदारांसाठी मुंबईत ३०० घरे बांधण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आल्यानंतर कालपासून सरकारवर जोरदार टीका होत आहे. त्यातच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आमदारांना ही घरे मोफत दिली जाणार नसून त्यांच्याकडून पैसे घेण्यात येणार आहेत, असा खुलासा त्यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत सांगितले […]
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक मंजूर
मुंबई : राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या कार्यालयीन कामकाजात आणि जनसंवाद व जनहिताशी संबंधित बाबींमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी तरतूद करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणे (राजभाषा) अधिनियम, 2022 हे विधेयक मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी प्रथम विधानसभेत व त्यानंतर विधानपरिषदेत मांडले. दोन्ही सभागृहात हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. शाळांमध्ये मराठी भाषेचा वापर होण्यासंदर्भात […]
वाळूची तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून कडक उपाययोजना
मुंबई : वाळूची तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून कडक उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. बुलढाणा जिल्ह्यातील गोळेगाव येथे वाळू माफियांतर्फे वाळू वाहतूक विरोध केल्याने एका व्यक्तीस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विधानसभा सदस्य सुनिल प्रभू, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य बबनराव लोणीकर यांनी प्रश्न उपस्थित […]
मोठी बातमी! आयपीएल सामन्यांवर दहशतवादाचे सावट, चौकशीदरम्यान दहशतवाद्यांनी दिली कबुली
IPL २०२२ : आयपीएलवर यावेळी दहशतवादाचे सावट पसरले आहे. मुंबई पोलिसांनी आयपीएल सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी केला आहे. एटीएसच्या चौकशीदरम्यान अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी याची कबुली दिली आहे. दहशतवाद्यांनी वानखेडे स्टेडियम, ट्रायडंट हॉटेल आणि आजूबाजूच्या रस्त्याची रेकी केली आणि सुरक्षेचाही आढावा घेतला. आयपीएल सामन्यांच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम, खेळाडू ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करतात तेथे सुरक्षा वाढवण्यात […]
मुंबई लोकलमधील गर्दी जीवावर बेतली, लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू
मुंबई : आज (बुधवार) सकाळीच धावत्या लोकलमधून पडल्याने एका २२ वर्षाय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबईत घडली आहे. सकाळी गोरेगाव ते मालाड स्थानकादरम्यान हा अपघात झाला असून बोरीवली रेल्वे पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सकाळच्या सुमारास लोकलमधून चर्चगेटच्या दिशेने जाताना ही घटना घडली. लोकलमध्ये सकाळच्या सुमारास मोठी गर्दी असते. त्यात हा […]







