मुंबई : प्रियकराने व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले, म्हणून 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय तरुणी आणि तिचा प्रियकर यांच्यात कशावरून तरी वाद झाला आणि त्यानंतर मुलाने या मुलीचा नंबर ब्लॉक केला. नंबर ब्लॉक झाल्याने दुखी होऊन मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. प्रणाली लोकरे असे मृत तरुणीचे नाव आहे. […]
मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित, स्वतःच दिली माहिती…
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्याच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. आज सकाळपासून अयोध्या दौरा रद्द होणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करत असल्याचे स्पष्ट केले. #अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1 — Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022 दौरा रद्द करण्यामागील कारण […]
90 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार शशांक वैदय याला अटक
मुंबई : खोटी बिले देऊन शासनाची करोडो रूपयांची महसुली हानी करणाऱ्या करदात्यांविरोधात शासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मे.एस.एस. सर्व्हिसेस या प्रकरणाचा तपास करून सुमारे 90 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार शशांक वैदय यांना अटक करण्यात आली असल्याचे वस्तू व सेवा कर विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. शशांक वैदय यांनी मे. एस. […]
कोविड काळानंतर जे. जे. रुग्णालयात प्रथम अवयवदान, किडनी, कॉर्निया, हृदय, छोटे आतडे यांचे दान
मुंबई : कोविड-१९ नंतर मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयातील प्रथम अवयवदान जे.जे. रूग्णालयात काल करण्यात आले असून समाजसेविका ॲड. रिना बनसोडे यांनी अवयवदान करून जगाचा निरोप घेतला आणि समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे, ॲड. बनसोडे यांच्या अवयवदानाबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत. मुंबईच्या अॅडव्होकेट रिना बनसोडे (वय ४३ वर्षे) यांना […]
स्वयंसहाय्यता गटांच्या शेतातील उत्पादनांचा तांदूळ आणि आंबा महोत्सव
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान – उमेदच्या राज्यभरातील स्वयंसहाय्यता गटांच्या शेतातील उत्पादनावर आधारित तांदूळ आणि आंबा महोत्सव दिनांक 20 ते 22 मे 2022 या कालावधीत पुणे विद्यार्थी गृहचे विद्याभवन, नेरूळ, नवी मुंबई येथे आयोजित केला आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांच्या शेतातील तांदुळाच्या विविध जाती, सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला हापूस, […]
पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा मिळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि खाजगी विकासकांमध्ये करार
मुंबई : कोविडचा प्रादुर्भाव संपल्यानंतर सेवा आणि आदरातिथ्य क्षेत्राच्या वाढीसाठी मोठा वाव आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील पाच पर्यटनस्थळांवर पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी उद्योजकांबरोबर करार करण्यात आला असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातील शासकीय जमिनीचा खाजगीकरणाच्या माध्यमातून पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याअंतर्गत […]
राज्यात लवकरच 7 हजार पदांसाठी पोलीस भरती
मुंबई : राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. गृहविभागातर्फे 7 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. गृहविभागातर्फे 7000 पदांसाठी ही भरती प्रक्रिया जून महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता आहे. लवकरच यासंबंधीची जहिरात देखील काढली […]
इंटरमिजिएट निकाल २० मे, एलिमेंटरी परीक्षेचा निकाल २३ मे रोजी जाहीर होणार
मुंबई : कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा 2021 शालेय स्तरावर दिनांक 9 एप्रिल ते 12 एप्रिल 2022 या कालावधीत इयत्ता 9 वी व इयत्ता 10 वी करिता अनुक्रमे एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांचे आयोजन करण्यात आले. इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल दिनांक 20 मे 2022 व एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड […]
केतकीला दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार, अभिनेत्री केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीला न्यायालयाने 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानुसार आज तिची पोलिस कोठडी संपली आज तिला कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, न्यायालयाने केतकीला दिलासा देण्यास नकार देत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, त्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ झाली असून, तिने जामिनासाठी ठाणे कोर्टात अर्ज […]
ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार – राजेश टोपे
मुंबई : बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील रूग्णांसाठी दंत चिकीत्सकांची सेवा आवश्यक असल्याने दंतचिकित्सक क्षेत्रातील विविध पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. ग्रामीण रूग्णालयांपर्यंत पदे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातही दातांवर उपचार मिळतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. दंत चिकित्सक क्षेत्राला उर्जितावस्था येण्यासाठी व धोरण आखण्यासाठी दंत परिषदेने अभ्यासगटाद्वारे […]










