मुंबई : निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला नोटीस पाठवली आहे. दोन्ही नेत्यांना शिवसेनेवर अधिकार असल्याच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना बहुमत सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांकडून ८ ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे. शिंदे गटाचा दावा […]
मुंबई
सलमान खानने घेतली पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट, ‘हे’ आहे कारण…
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने वैयक्तिक संरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळावा यासाठी मुंबई पोलिसांकडे अर्ज सादर केला आहे. अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना सिद्धू मूसवाला प्रमाणे मारू, असे या धमकीत म्हटले होते. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर काही दिवसांनीच सलमान खान आणि सलीम खान […]
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई महानगरपालिकेस प्रत्येकी १० लाख रुपये निधी
मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई जिल्ह्यात या महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येणार आहे. जनसामान्यांचा अधिकाधिक सहभाग मिळण्याच्या हेतूने स्वराज्य महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुंबई शहर व महानगरपालिका यांना प्रत्येकी 10 लाख रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात […]
सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील संस्था, कंपन्यांनी मनुष्यबळाची माहिती 31 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन
मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सर्व संस्था व कंपन्यांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाची माहिती (ER-I) राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या http://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रविंद्र […]
गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधांविना! गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे मिळणार
मुंबई : गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण – उत्सव शांततेत उत्साहात आणि जल्लोषात पार पडावेत यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन व एक खिडकी योजनेंतर्गत देण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यानी तातडीने कार्यवाही […]
अतिवृष्टीग्रस्त भागातील 14 हजार 480 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
मुंबई : राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व २९९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नगरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अंशत: नुकसान […]
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गेल्या महिन्यात लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर अनेक नेते मंडळी आणि निकटवर्तियांना राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यातच आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी देखील राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थावर त्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज […]
सुमारे 117.14 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एका व्यक्तीस अटक
मुंबई : खोटी खरेदीची बिजके प्राप्त करून शासनाची करोडो रुपयांची महसूलहानी करणाऱ्या करदाता मे पाकीजा स्टिल एलएलपी चे भागीदार आणि मे मायल स्टिल प्रा.लि. चे संचालक सय्यद तैकीर हसन रिजवी यांनी या प्रकरणामध्ये वस्तूंच्या वा सेवांच्या पुरवठ्याशिवाय ९९.२७ कोटी रुपयांची बनावट बीजके प्राप्त करुन १७.८७ कोटी रुपयांची बनावट वजावट मिळविल्याप्रकरणी सय्यद तैकीर हसन रिजवी या […]
श्री गुंडी जत्रेनिमित्त राज्यपालांची राजभवनातील देवी मंदिरात आरती
मुंबई : कोरोनामुळे दोन वर्षांच्या अवकाशानंतर यंदा होत असलेल्या राजभवनातील प्राचीन श्रीगुंडी देवीच्या यात्रेनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज देवी मंदिरात जाऊन भाविकांसमवेत श्री गुंडी देवीची आरती केली. यावेळी दर्शनासाठी विविध भागातून आलेल्या कोळी बांधवांनी पारंपरिक नृत्य केले. अनेक दशकांची परंपरा असलेली ही जत्रा कोरोनामुळे दोन वर्षे झाली नव्हती.
मुलगा वृद्ध वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी टाळू शकत नाही – मुंबई उच्च न्यायालय
मुंबई : मुलगा आपल्या वृद्ध आणि आजारी वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी टाळू शकत नाही आणि तसेच वडिलांना देखभाल करण्यासाठी अट म्हणून त्याच्यासोबत राहण्याचा हुकूम देऊ शकत नाही, असे औरंगाबाद येथील मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच म्हटले आहे. एकल-न्यायाधीश न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी मुलाकडून भरणपोषणाची मागणी करणाऱ्या वडिलांच्या याचिकेवर सुनावणी करताना, मुलाने वडिलांना त्याच्यासोबत राहण्याचा आग्रह केल्याचे नमूद […]










