मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते व इमारती उपक्षेत्राकरिता प्रलंबित देयके अदा करण्यासाठी सन 2024- 25 मध्ये आतापर्यंत 15 हजार 91 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच या तरतुदीपैकी फेब्रुवारी 2025 मध्ये विविध घटकांसाठी एकूण 683 कोटी 72 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आली आहे. प्रलंबित देयके […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी घोड धरणावरून नवी पाणी पुरवठा योजना तातडीने मार्गी लावा, उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबई : पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक, तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच ग्रामपंचायत हद्दीत ‘एमआयडीसी’ असल्यामुळे या क्षेत्रात स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण अधिक असून भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन जलजीवन मिशनअंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिल्या. रांजणगावची भविष्यातील गरज […]
अभिनेत्री आणि तिच्या मैत्रिणीचा गोव्यात दुचाकी चालवताना लैंगिक छळ, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
गोवा : दोन महिलांवर लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली गोवा पोलिसांनी एका पुरूषावर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी रात्री दोन महिला दुचाकीवरून जात असताना पणजीतील एका बँकेजवळ ही घटना घडली. त्यापैकी एक महिला अभिनेत्री असून तिने पोलिस तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये तिने सांगितले की ती आणि तिची मैत्रीण रात्री १०.१५ वाजता घरी परतत असताना ही […]
काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेप, १९८४ च्या शीखविरोधी दंगल प्रकरणात शिक्षा
नवी दिल्ली : १९८४ च्या शीखविरोधी दंगलींमध्ये, विशेषतः सरस्वती विहार हिंसाचार प्रकरणात, दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दिल्ली कॅन्टोन्मेंट दंगली प्रकरणात सहभागी असल्याबद्दल शिक्षा भोगत असलेल्या कुमार यांना सुनावण्यात आलेली ही दुसरी जन्मठेपेची शिक्षा आहे. सुनावणीदरम्यान, दिल्ली पोलिस आणि पीडितांनी न्यायालयाला हे प्रकरण “दुर्मिळातील दुर्मिळ” म्हणून वर्गीकृत […]
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७ महत्वाचे निर्णय, पशुवैद्यक महाविद्यालये आणि जलपुरवठा योजनांचा समावेश
मुंबई : फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात पशुवैद्यक विषयात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय झाला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बीड जिल्ह्यातील परळी येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय : 1) पौड, ता. मुळशी, जिल्हा पुणे येथे लिंक कोर्टऐवजी […]
पुणे : जेजुरीजवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू
पुणे : पुण्यापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या जेजुरीजवळील दौंडजवळ एका भयंकर मोटारसायकल अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी ४:३० च्या सुमारास घडली. जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही व्यक्ती मोटारसायकलवरून रस्त्याच्या चुकीच्या बाजूस जात असताना चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि ते रस्त्याच्या कडेला पडले. या अपघातात दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्या […]
राज्यातील विद्यार्थ्यांना कोडिंग आणि रोबोटिक्सचे प्राथमिक शिक्षण सहज उपलब्ध – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (DVET) वतीने राज्यभरातील १०४९ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘कोडिंग आणि रोबोटिक्स’ या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबिनारमध्ये ५०,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हे अत्यंत अभिमानास्पद असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त सांगितले. दक्षिण मुंबईतील इयत्ता नववीतील ११ विद्यार्थ्यांनी स्वतः […]
शशि थरूर यांचा काँग्रेसला थेट इशारा: काँग्रेसमध्ये आजवरच्या सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता?
काँग्रेसचे खासदार शशि थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची खुलेआम प्रशंसा केल्यानंतर पक्षाच्या गोटात गदारोळ उडाला आहे. त्यावर आता काँग्रेसने थरूर यांच्यावर टीका सुरू केली आहे. थरूर यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेतला होता, आणि आता त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थरूर […]
नीलम गोऱ्हे यांच्या वादग्रस्त विधानावर उद्धव ठाकरे गटाचे तीव्र प्रत्युत्तर; ठाकरे गटाने कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली
मुंबई : शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील साहित्य संमेलनात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयी वादग्रस्त विधान केले. गोऱ्हे यांनी म्हटले की, ठाकरे यांच्या शिवसेनेत पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागतात. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ उडाला आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी गोऱ्हे यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. पेडणेकर म्हणाल्या, […]
मुंबईत हिट अँड रनची हृदयद्रावक घटना; मद्यधुंद चालकाने महिला आणि तिच्या चिमुकल्यावर गाडी चढवली
मुंबई : मुंबईतील वडाळा परिसरात रविवारी रात्री एक हिट अँड रनची घटना घडली. मद्यधुंद अवस्थेतील एका कारचालकाने घराबाहेर झोपलेल्या महिला आणि तिच्या तीन वर्षांच्या मुलावर गाडी चढवली. या अपघातात लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर महिला गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. घटना वडाळा येथील राम मंदिर, बाळाराम खेडेकर मार्गावर मध्यरात्री घडली. प्रत्यक्षदर्शींनुसार, […]










