पुणे : पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत असून खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग बुधवारी वाढविण्यात आला. सकाळी १० वाजता घेतलेल्या निर्णयानुसार सुरुवातीला ६,४५१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता, जो नंतर ८,५२२ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. स्वारगेट येथील मुठा कालवा सिंचन उपविभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पुण्यात खळबळ! २५ वर्षीय महिलेवर घरात घुसून बलात्कार, डिलिव्हरी एजंट असल्याचे सांगत सोसायटीत प्रवेश आणि…
पुणे : कोंढवा येथे एका २५ वर्षीय महिलेसोबत तिच्या राहत्या घरी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बुधवारी संध्याकाळी सुमारे ७:३० वाजता घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला कोंढव्यातील एका उच्चभ्रू गेटेड सोसायटीत तिच्या भावासोबत राहते. घटना घडली त्या वेळी पीडित महिला घरात […]
संगमनेरातील कत्तलखाने व अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष – आमदार खताळ यांचा सभागृहात आरोप
अहिल्यानगर : संगमनेर शहरातील अवैध कत्तलखाने व इतर गुन्हेगारी कारवायांबाबत स्थानिक पोलिस अधिकारी शासनाला खोटी माहिती देत असल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल खताळ यांनी राज्य विधिमंडळात केला आहे. विधिमंडळात लक्षवेधी सूचनेद्वारे बोलताना आमदार खताळ यांनी सांगितले की, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी व शहर पोलीस निरीक्षक यांनी गोवंश हत्याबंदी कायद्यातील कारवाई बाबत चुकीची व दिशाभूल करणारी […]
पुणे स्वारगेट बस स्थानक बलात्कारप्रकरणी आरोपीला जामीन नाकारला; न्यायालयाने म्हटले – “सवयीचा गुन्हेगार”
पुणे : पुण्यातील स्थानिक न्यायालयाने बुधवारी (२ जुलै) स्वारगेट एसटी बस स्थानकावर एका महिला प्रवाशावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या दत्तात्रय रामदास गाडे याला जामीन नाकारला. न्यायालयाने आरोपीला “सवयीचा गुन्हेगार” ठरवून स्पष्टपणे सांगितले की, त्याला जामिनावर सोडल्यास तो पुन्हा असे गंभीर गुन्हे करण्याची शक्यता आहे. ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ […]
मुंबईत खळबळ! कॉलेजमधील शिक्षिकेकडून विद्यार्थ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार, शिक्षिकेला अटक
मुंबई : मुंबईतील एका नामांकित कॉलेजमधील शिक्षिकेला एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गत (POCSO) ही कारवाई करण्यात आली. आरोपी शिक्षिकेने 16 वर्षीय विद्यार्थ्यावर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय शिक्षिका विवाहित असून तिला मुले आहेत. ती मुंबईत एका कॉलेजमध्ये इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्याला शिकवत […]
नऱ्हे परिसरातील विविध प्रश्नांवर भूपेंद्र मोरेंची ठाम भूमिका; आढावा बैठकीत चाकणकरांकडून कौतुक
पुणे : महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात समाविष्ट गावांसह परिसरातील विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन आदी मूलभूत प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी सहाय्यक आयुक्त श्रद्धा पोतदार, पुणे महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. […]
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत
मुंबई : उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांनी उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत करण्याची विनंती केली होती. त्यानंतर तत्काळ एनडीआरएफच्या पथकाने धाव घेवून या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले […]
अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या योजनांना बळी न पडता योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. याबाबत सदस्य भिमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांनी […]
टायर पायरोलिसिस रिसायकलिंग कंपन्यांनी कार्यप्रणालीचे पालन करणे बंधनकारक – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
मुंबई : टायर पायरोलिसिस रिसायकलिंग प्रक्रियेविषयी राष्ट्रीय हरित लवादाने तयार केलेल्या कार्यप्रणालीचे पालन करणे सर्व टायर रिसायकलिंग कंपन्यांसाठी बंधनकारक असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली. सदस्य दौलत दरोडा यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. मंत्री मुंडे म्हणाल्या, टायर पायरोलिसिस प्रक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी, राष्ट्रीय हरित लवादाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एक सुस्पष्ट […]
मुंब्रा येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाणार – गृह राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई : मुंब्रा येथे अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि तिची निर्घृण हत्या ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास जलदगतीने पूर्ण करून पीडितेला न्याय मिळावा, यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात येईल, असेही त्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत […]








