पुणे : हिवाळ्यात सर्दी, फ्लू आणि संसर्ग पसरण्याचा धोका लक्षणीय वाढतो. या ऋतूत थंडीपासून वाचण्यासाठी लोक उबदार कपडे, गरम पाणी, चहा-कॉफी यासारख्या गोष्टींचा अवलंब करतात. पण तुम्हाला माहित आहे का की सर्दीपासून आराम मिळवण्याच्या काही युक्त्या तुमच्यासाठी समस्या देखील निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ, जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ केल्यानेही शरीराला हानी पोहोचते. हिवाळ्यात कोणत्या चुका […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
महागाईचा भडका! दिवाळीच्या सुरुवातीलाच एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ
मुंबई : एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. १ नोव्हेंबर रोजी कमर्शिअल सिलिंडरच्या दरात तब्बल 266 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या वाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो वजनाच्या कमर्शिअल सिलिंडरची किंमत दोन हजार रुपयांच्या पुढे गेली आहे. घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत […]
दोष नसतानाही माझ्यावर आलेली ‘ती’ वेळ कोणावरही येऊ नये – अनिलकुमार गायकवाड
मुंबई : दोष नसतानादेखील सलग २२ महिने मला सेवेतून बाजूला रहावे लागले, प्रशासनात माझी बाजू ऐकून घेतली गेली नाही, तरीही मी लढत राहिलो आणि निर्दोष बाहेर पडलो. परंतु, निर्दोष असतानाही ज्या यातना असतात या सबंधित व्यक्तीलाच माहित असतात, असे सांगतानाच माझ्यासारखी वेळ कुणावरही येवू देवू नका अशी खंत सार्वजनिक रस्ते व बांधकाम सचिव अनिलकुमार गायकवाड […]
सुख म्हणजे नक्की काय असतं? पती-पत्नीच्या नात्यामध्ये ‘या’ गोष्टी असतात खूपच महत्वाच्या
पुणे : आपल्या जोडीदाराशी आपले नाते चांगले असावे, असे आपल्याला नेहमी वाटते. परंतु, त्यासाठी आपल्याला प्रामाणिक आणि मनापासून प्रयत्न करायला हवे. पती-पत्नीने एकमेकांबद्दल प्रेमाने बोलावे, प्रेम व्यक्त करावे, मनमोकळेपणाने आपल्या भावना एकमेकांसमोर मांडाव्यात. पती-पत्नीचे नाते सर्वात मजबूत मानले जाते. परंतु, पती-पत्नी दोघांचीही अशी अपेक्षा असते की आपल्या जोडीदाराने आपल्याला समजून घ्यावे आणि त्यांना पाठिंबा द्यावा. […]
दुःखद! ज्येष्ठ अभिनेते युसुफ हुसेन यांचे कोरोनाने निधन
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते युसुफ हुसेन यांचं निधन झालं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते 73 वर्षांचे होते. युसुफ हुसैन यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. हंसल मेहता यांनी स्वत: ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. हुसेन हे निर्माते आणि दिग्दर्शक हंसल मेहता यांचे सासरे होते. युसूफ हुसेन […]
पाकिस्तान विरुध्द भारताच्या पराभवानंतर काही खेळाडूंविषयी उमटलेल्या प्रतिक्रिया अशोभनीय
मुंबई : पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर काही खेळाडूंविषयी उमटत असलेल्या प्रतिक्रिया या अशोभनीय असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. वानखेडे स्टेडियम येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावे “द सुनील गावस्कर हॉस्पिटॅलिटी बॉक्स” आणि माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या नावाने स्टेडियम […]
मुंबई क्रिकेट असोसिएशनला संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : राज्यात आणि देशात उत्तम क्रिकेट खेळाडू निर्माण व्हावेत आणि त्यांनी आपल्या देशाचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रिकेटच्या विकासासंदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनला राज्य शासन पूर्णपणे सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री बोलत होते. वानखेडे स्टेडियम येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते, ज्येष्ठ नेते खासदार […]
जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणीची प्रक्रिया एकत्रितपणे करावी, धनंजय मुंडे यांचे निर्देश
पुणे : जातीचे प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र वैधता पडताळणी या दोन्ही प्रक्रिया एकीकृत (इंटिग्रेटेड) कराव्यात आणि पारपत्र वितरण व्यवस्थेप्रमाणे ही प्रक्रिया अत्याधुनिक करावी, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) कामकाजाचा आढावा सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांनी बार्टीच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. जात वैधता प्रमाणपत्र […]
मुंबईतील शासकीय, खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्यविषयक ऑन जॉब ट्रेनिंगची संधी
मुंबई : आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या 18 ते 45 वर्षे वयोगटातील युवक-युवतीना मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय व नामांकित खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्य क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमांमध्ये विनाशुल्क प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंगही देण्यात येणार असून या कालावधीत विद्यावेतन देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे […]
MPSC परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना ३० – ३१ ऑक्टोबरला लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार असून परीक्षार्थी तसेच परीक्षा घेण्याच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 30 व 31 ऑक्टोबरला लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी असे पत्र राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला देण्यात आले आहे. राज्य शासनाकडून मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेच्या विभागीय प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात, परीक्षार्थी, […]










