मुंबई : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सागरी किनारपट्टी तसेच राज्यातील काही जिल्ह्यात पडझड झालेल्या प्राथमिक शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी एकूण रु. 12 कोटी 93 लाख रुपये एवढा निधी वितरीत करण्यात आला आहे अशी माहिती, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. 16 व 17 मे 2021 रोजी झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सागरी किनारपट्टी क्षेत्रात तसेच राज्याच्या काही भागात […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पोस्ट ऑफिस गुंतवणूकदारांनो लवकर करा ‘हे’ महत्त्वाचे काम, अन्यथा मिळणार नाही व्याज
पोस्ट ऑफिसने आता 1 एप्रिल 2022 पासून कोणत्याही प्रकारच्या लहान बचत योजना जसे की ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), मासिक गुंतवणूक योजना (MIS), टाइम डिपॉझिट खाते इत्यादीसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बँक खाते उघडणे आवश्यक केले आहे. या लहान बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला मिळणारे व्याज पोस्ट ऑफिस बचत खात्यात किंवा बँक खात्यातच जमा केले […]
पेट्रोल टंचाईचा धोका निर्माण होण्याची शक्यता, पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली ‘ही’ भीती
औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता दिसत आहे. मात्र, सध्याचे रशिया आणि युक्रेन युद्ध असेच सुरू राहिले. तर आगामी काही दिवसात पेट्रोलची टंचाई निर्माण होण्याची भीती पेट्रोल पंप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडू शकते. पेट्रोलच्या दरवाढीसोबत आता पेट्रोलच्या टंचाईचाही धोका निर्माण […]
दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिकच, थायलंडच्या अधिकाऱ्यांनी केली पुष्टी
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याची पुष्टी थायलंडच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. थायलंडमध्ये शुक्रवारी 52 वर्षीय शेन वॉर्नचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. राष्ट्रीय पोलीस उपप्रवक्ता किसाना फथनाचारोएन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की “आज तपासकर्त्यांना शेन वॉर्नचा शवविच्छेदन अहवाल मिळाला, ज्यात वैद्यकीय मतानुसार मृत्यूचे कारण नैसर्गिक असल्याचे […]
नवाब मलिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, विशेष न्यायालयाकडून ईडीची मागणी मान्य
मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना विशेष न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत होते. मात्र, आजच्या सुनावणीदरम्यान ईडीने नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यास हरकत […]
तीन मित्रांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू, फोटोशूट करताना घडला अनर्थ…
पुणे : तीन मित्रांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडली आहे. रात्री उशिरा तिघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. दौंड शहरातील कुरकुंभ रस्त्यावरील मोरवस्तीजवळ महापालिकेच्या पाणी साठवण तलावात तीन मित्रांचा बुडून मृत्यू झाला. तलावावर फोटोशूट करताना पाण्यात पडून तिघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. असरार अलीम काझी (21), […]
चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, अनेक शहरांना रेड अलर्ट
चीन : चीनच्या ज्या शहरात कोरोना विषाणू पहिल्यांदा आढळून आला होता, त्या वुहान शहरात कोरोना पुन्हा एकदा जोर धरताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत वुहानमध्ये कोरोनाचे ५२६ रुग्ण आढळून आलेत. गेल्या दोन वर्षांतील एका दिवसाच्या संक्रमणाचा हा सर्वात मोठा आकडा आहे. २४ तासांत कोरोनाच्या ५०० हून अधिक रुग्णांची नोंद झाल्यानं चीनच्या ‘कोव्हिड झिरो धोरणा’ला […]
वडिलांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू
बुलंदशहर : दारूच्या नशेत असलेल्या वडिलांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या चिमुकलीचा रविवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत सायना येथील मोहल्ला कसाईवाडा येथील रहिवासी असलेल्या इक्बाल यांनी 4 मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, इक्बाल यांची भाची शाहीन आपल्या दोन वर्षांची मुलगी सोफिया आणि नवरा कल्लू यांच्यासोबत लग्नाला आली होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कल्लू त्याच्या पत्नीला […]
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिका येथे करण्यात आले. या पुतळ्याची उंची सुमारे ९.५ फूट इतकी आहे. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रधानमंत्री मोदी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन […]
मुंबईतील ‘डबेवाला भवन’चे उद्घाटन
मुंबई : बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते. त्या नसा असतील तर मुंबईतील डबेवाले रक्त आहेत, अशा शब्दात पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील डबेवाल्यांच्या कार्याचे कौतुक केले. मुंबई महानगरपालिकेच्या शेरली, बांद्रा व्हिलेज, बांद्रा (पश्चिम) येथील समाज कल्याण केंद्राची २८६.२७ चौ. मी. क्षेत्रफळाची जागा मुंबई टिफिन बॉक्स […]










