पुणे : इतिहास आणि वारसा यांचा संगम पिंपरी-चिंचवडमध्ये दिसून आला. मोशी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्यदिव्य पुतळ्याला लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्सने जगातील सर्वात उंच संभाजी महाराजांचा पुतळा म्हणून अधिकृत ओळख दिली आहे. ‘हिंदुभूषण’ या नावाचा हा पुतळा १०० फूट उंच असून, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, मोशी येथे पूर्णत्वाच्या जवळ पोहोचत आहे. हा प्रकल्प खासदार महेश […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
काळू धबधब्याजवळ दरड कोसळली, पुण्यातील २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू
पुणे : रविवारी सकाळी माळशेज घाटाजवळील काळू धबधब्याजवळ दरड कोसळून पुण्यातील २३ वर्षीय हिमालकुमार बिनोदकुमार सिंग (खराडी) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत त्याचा साथीदार अंशुमन मौर्य (२३) जखमी झाला. दोघेही पुण्यातील ट्रेकिंग गटाचा भाग म्हणून धबधब्याला भेट देण्यासाठी गेले होते. सकाळी ट्रेकिंग पूर्ण केल्यानंतर हा गट काळू धबधब्यावर पोहोचला, जो पाच टप्प्यात कोसळतो आणि […]
ह्युंदाई कंपनीने राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करीत रोजगार निर्मिती वाढवावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : वाहन उद्योगात ह्युंदाई कंपनीचे मोठे नाव आहे. कंपनीने राज्यातही गुंतवणूक केली आहे. पुणे येथील प्रकल्पातून वाहन उत्पादनात वाढ होणार आहे. ह्युंदाई कंपनीने राज्यात वाहन उद्योगात अधिकाधिक गुंतवणूक करीत रोजगार निर्मितीमध्ये वाढ करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी ह्युंदाई कंपनीच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत केले. ह्युंदाई कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू किम यांनी […]
समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मर्सिडीज कंपनीचे योगदान मोलाचे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
पुणे : समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने घेतलेला पुढाकार हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून इतर संस्थांनी देखील त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते आज चाकण येथे मर्सिडीज कंपनीच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर बोलत होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, “रोड हिप्नोसिस” (रोड संमोहन) ही अवस्था अनेकदा अपघातास कारणीभूत ठरते. […]
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची लोणावळा बसस्थानकाला भेट
पुणे : राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची आज लोणावळा बसस्थानकाला भेट देवून परिसराची पाहणी केली. यावेळी महामंडळाचे नियोजन व पणन महाव्यवस्थापक जयेश बामणे, प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक अरुण सिया आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. बसस्थानक येथील प्रसाधनगृहाची पाहणी उपहारगृहालाही भेट दिल्यानंतर सरनाईक म्हणाले, मंत्री महोदय भेट देणार […]
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचावकार्यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकलेल्या ४० ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अतिवृष्टी […]
पुणे : विमानतळ रोडवर आयटी कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला; दोघांना अटक
पुणे : पुण्यातील टेक कॉरिडॉरमध्ये सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनवणारी एक धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे घडली. विमानतळ रोडवरील अमर टेक पार्कजवळ ३३ वर्षीय आयटी कर्मचाऱ्यावर तीन ते चार हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला केला. ही घटना पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. पश्चिम बंगालमधील मूळ रहिवासी असलेला पीडित आपल्या होणाऱ्या पत्नीला कामाच्या ठिकाणाहून घेण्यासाठी गाडीवर थांबला होता. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर झडप […]
तरुणाने सर्जिकल ब्लेडने कापले स्वतःचे गुप्तांग, धक्कादायक कारण आलं समोर…
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने सर्जिकल ब्लेडने आपले गुप्तांग कापले. त्यानंतर घरमालकाच्या लक्षात आल्यानंतर घरमालकाने खोलीत वेदनेने तडफडणाऱ्या तरुणाला रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्या तरुणाला एसआरएन रुग्णालयात रेफर केले. सध्या एसआरएन रुग्णालयाच्या सर्जिकल […]
पुणे : कारच्या धडकेत दोन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; महिला चालकाविरुद्ध FIR दाखल
पुणे : लोहेगाव येथील एअर फोर्स कॉलनीत दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास दोन वर्षांचा विदार्थ विपिन मावी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विदार्थ आपल्या घराबाहेर खेळत असताना कॉलनीतील एका महिला रहिवाशीनं त्याला कारने धडक दिली. विदार्थ घराबाहेर खेळत असताना कॉलनीतील एका महिलेच्या कारची त्याला धडक बसली. दरम्यान, त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित […]
नागरिकांनी आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा
मुंबई : महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत असून राज्यातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एकत्रित योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांच्या मर्यादेत १३५६ उपचार पद्धतींवर शासकीय तसेच खासगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार मिळणार आहेत. पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना […]










