Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

उपसा जलसिंचन योजनेमधील शेतकऱ्यांना वीज दरात सवलत

मुंबई : राज्यातील कृषी पंप ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अति उच्चदाब व उच्चदाब उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना जून 2021 पासून 1 रुपया 16 पैसे प्रति युनिट व स्थिर आकारामध्ये 25 रुपये प्रति केव्हीए इतकी सवलत कायम ठेवण्यात येईल. या अनुषंगाने 351 कोटी 57 लाख रुपये […]

Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र

ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील पात्र परंतु भूमिहीन लाभार्थींना जागा देण्याबाबत निर्णय

मुंबई : ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील पात्र परंतु भूमिहीन लाभार्थींना जागा देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेतील लाभार्थ्यांना जागा खरेदी करताना प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या धर्तीवर 1 हजार रुपये इतकी मुद्रांक शुल्क रक्कम निश्चित करण्यात येईल. लाभार्थींनी खरेदी केलेल्या जागेकरीताच मोजणी शुल्कामध्ये 50 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येईल. […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

विधि व न्याय विभागात सहसचिव हे पद नव्याने निर्माण करण्यास मान्यता

मुंबई :  विधि व न्याय विभागात सहसचिव (विधी) हे गट – अ संवर्गातील पद निर्माण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या विभागातील कामकाजाचा वाढता ताण विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

2 वर्षे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ, अतिवृष्टी- पूरग्रस्तांचा समावेश, राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि 6 हजार कोटी रुपये निधी लागेल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 13.85 लाख शेतकऱ्यांच्या 14.57 लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे रु. 5722 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. […]

Sessions Court
देश

बलात्कारामुळे पीडित व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तिमत्व नष्ट होते, आयुष्यभरासाठी आघात होतो – पाटणा उच्च न्यायालय

बिहार : एका अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाची हानी होते आणि पीडितेला आजीवन आघात सहन करावा लागतो, असे पाटणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने 2007 ते 2013 या काळात आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला सुनावलेली शिक्षा आणि जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती अनंत बदर आणि न्यायमूर्ती राजेश कुमार वर्मा यांच्या खंडपीठाने असे […]

Mantralaya Mumbai
महाराष्ट्र मुंबई

औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदीला स्थगिती आदेश लागू नाही; मुख्यमंत्र्यांचे आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागाला निर्देश

मुंबई : आरोग्य सेवा ही एक अत्यावश्यक सेवा असून, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खरेदी करावयाच्या औषधे, सर्जिकल्स साहित्य, कन्झुमेबल्स, रसायने व उपकरणे यांना स्थगितीच्या आदेशातून वगळण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत १ एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत जिल्हा वार्षिक […]

Public awareness by Food and Drug Administration at Film City for nutrition through 'Eat Right'
महाराष्ट्र मुंबई

‘इट राईट’ च्या माध्यमातून पोषणवर्धनासाठी फिल्म सिटी येथे अन्न व औषध प्रशासनातर्फे जनजागृती

मुंबई : फूड सेफ्टी ॲण्ड स्टँडर्स ॲथॉरीटी ऑफ इंडिया (FSSAI), नवी दिल्ली द्वारे नागरिकांचे आरोग्य व पोषणस्तर सुव्यवस्थित राहण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात, त्याचाच एक भाग म्हणून, प्रतिवर्षी संपूर्ण भारतात इट राईट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याच धर्तीवर यावर्षीदेखील महाराष्ट्र सरकारच्या अन्न व औषधी प्रशासन विभाग (मुंबई विभाग) आणि पाथ (PATH) या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे इट […]

Covovax trials finally begin in India
देश पुणे महाराष्ट्र

मंकीपॉक्स लसीबाबत अदार पूनावाला नक्की काय म्हणाले? जाणून घ्या…

पुणे : दिल्लीत मंकीपॉक्स विषाणूची एक केस आढळून आल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदार पूनावाला म्हणाले की, भारतात मांकीपॉक्सचे प्रमाण वाढल्यास, त्यांची कंपनी डॅनिश चेचक लसीचे काही दशलक्ष डोस आयात करण्यास तयार आहे. मंकीपॉक्सवर उपचार करण्यासाठी स्मॉलपॉक्स लसींचा वापर केला जाऊ शकतो. अदार पूनावाला यांनी असेही सांगितले की त्यांची कंपनी भारतातील लोकांना […]

Abandonment of reservation of nine Municipal Corporations on August 5
महाराष्ट्र

नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची 5 ऑगस्टला सोडत

मुंबई : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यांची आरक्षण सोडत काढल्यानंतर […]

The amended proposal regarding Ratnagiri Medical College should be presented in the cabinet meeting on priority, Chief Minister's instructions
महाराष्ट्र रत्नागिरी

गौण खनिज परवान्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : अल्पमुदतीचे गौण खनिजे परवान्यासाठी पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने तातडीने रत्नागिरी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करुन यामधून चिरेखाण व्यावसायिकांना परवाने द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. रत्नागिरी येथील चिरेखाण व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोकणात चिरेखाणीबरोबरच मुरुममाती काढण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. हा व्यवसाय करण्यासाठी चिरेखाण […]