पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील मासुळकर कॉलनी परिसरात एका सात वर्षीय मुलाचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आली होती. आदित्य ओगले असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. सुरुवातीला खंडणीसाठी हा खून झाल्याचे कारण समोर आले होते. मात्र, पोलिसांनी या घटनेचा तपास केला असून एकतर्फी प्रेमातून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. घटनेतील मुख्य […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
बापरे..! भक्ताने मंदिरात अर्पण करण्यासाठी कापली स्वतःची जीभ, रुग्णालयात उपचार सुरु
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. शीतला मातेच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या पूरब शरारा गावातील रहिवासी असलेल्या एका भाविकाने आपली जीभ कापून ती मंदिरात अर्पण केली. त्याच्या तोंडातून रक्त येत असल्याचे पाहून उपस्थित लोकांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. सध्या […]
ब्रेकिंग! मुंबईतील प्रभादेवी परिसरात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई : मुंबईतील प्रभादेवी परिसरात भीषण आग लागली असून सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी हजर आहेत. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सामना प्रेस समोर कामगार नगर न्यू प्रभादेवी रोड येथे ही आग लागली असून ही लेव्हल-1 […]
राजभवन येथील 11 सप्टेंबर रोजीचा सरन्यायाधीश यांचा सत्कार समारंभ पुढे ढकलला
मुंबई : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचे दुःखद निधन झाल्यामुळे भारत सरकारने 11 सप्टेंबर 2022 रोजी संपूर्ण देशभर दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने रविवार 11 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई, राजभवन येथे आयोजित केलेला भारताचे सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांचा सत्कार समारंभ पुढे ढकलण्यात आलेला आहे, असे अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग […]
सोशल मीडियाचं व्यसन जडलंय? यातून बाहेर पडण्यासाठी करा ‘हे’ उपाय…
पुणे : सोशल मीडियाचा अतिवापर आज मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काही गंभीर परिणाम होऊ शकतो. सोशल मीडियावर तुम्ही अनेक मिनिटे किंवा तास गमावत असल्यास, असे तुम्ही एकटे नाही आहात. आजकाल असे फारच कमी लोक आहेत जे सोशल मीडियाचा वापर करत नाहीत. तुम्ही सोशल मीडियाचा आनंद घेऊ शकता आणि […]
अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी वाढीव दराने 3501 कोटी रुपयांची मदत
मुंबई : राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे एकूण 23 लाख 81 हजार 920 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने वितरीत करण्यात येणार आहे. आपदग्रस्त शेतक-यांना मंजूर मदत […]
याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणाचा वाद, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
मुंबई : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणाच्या वादाच्या दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सांगितले की या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, “या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याची चौकशीही सुरू करण्यात आली आहे. याला जबाबदार […]
अपघातचक्र सुरूच! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा भीषण अपघात; एक जण जागीच ठार
लोणवाला : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट जवळील तीव्र उतारावर भीषण अपघात झाला आहे. कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यामुळे कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने पुढे जाणाऱ्या एका इर्टिगा कारला धडक दिली आणि त्यानंतर कंटेनर मार्गाच्या कडेला उलटून अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून कार चालक किरकोळ जखमी झाला आहे. […]
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या तथापि, अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केला नाही अशांनी तत्काळ ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी, पुणे यांनी केले आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या असून, चालू शैक्षणिक वर्षात वैधता […]
पशुधन वाचविण्यासाठी शासन खंबीर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
औरंगाबाद : राज्यात 17 जिल्ह्यात लंपी स्कीन डिसिज आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे. राज्यात या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जनावरांचे लसीकरण व आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी शासन खंबीर असल्याचेही ते म्हणाले. विभागीय आयुक्तालयात लंपी स्कीन डिसिज आजारासंदर्भात उपाययोजना संदर्भातील बैठक मंत्री विखे […]










