Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र शेती

शंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी वाढीव दराने 98 कोटी रुपयांची मदत

मुंबई : राज्यात लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबत मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते त्यानुसार शंखी गोगलगायीमुळे शेती पिकांच्या नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना 98 कोटी 58 लाख रूपये निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी पेक्षा वाढीव दराने मदत वितरित करण्यात येणार […]

Robin Uthappa Retires From All Forms Of Indian Cricket
क्रीडा

भारतीय क्रिकेटर रॉबिन उथप्पाची निवृत्तीची घोषणा, सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

कर्नाटक : 2007 मध्ये भारताच्या T20 विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा फलंदाज रॉबिन उथप्पाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बुधवारी त्याने निवृत्ती जाहीर केली. उथप्पाने ट्विट करत लिहिले, ‘मी व्यावसायिक क्रिकेट खेळून २० वर्षे झाली आहेत आणि माझा देश आणि राज्य कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणे हा सर्वात मोठा सन्मान आहे. चढ-उतारांनी भरलेला हा एक अद्भुत […]

Air India Flight Catches Fire At Muscat Airport, Passengers Safe
ग्लोबल देश

एअर इंडियाच्या विमानाच्या एका इंजिनमध्ये लागली आग, सर्व प्रवासी सुरक्षित

नवी दिल्ली : कोचीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात आज एका इंजिनमध्ये आग लागल्याचे आढळून आल्यानंतर ते रिकामे करण्यात आले. ओमानमधील मस्कत विमानतळावर टेकऑफच्या आधी हा प्रकार घडला. सर्व क्रू आणि 145 प्रवासी, यांना विमानातून बाहेर काढण्यात आले आणि टर्मिनल इमारतीत हलवण्यात आले. यात चार लहान बाळांचा समावेश आहे. कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. नागरी उड्डाण […]

President Droupadi Murmu To Attend Queen Elizabeth II's Funeral On Monday
ग्लोबल देश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी युनायटेड किंगडमला जाणार आहेत. भारत सरकारच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 17-19 सप्टेंबर 2022 रोजी लंडनला भेट देतील. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे अंत्यसंस्कार 19 सप्टेंबर रोजी वेस्टमिन्स्टर ऍबे येथे होणार आहेत. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारासाठी शेकडो राष्ट्रप्रमुख […]

Bachchu Kadu fined Rs 20,000 for arguing with police 17 years ago
महाराष्ट्र मुंबई

बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गिरगाव कोर्टाने बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अकोल्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू यांनी विविध राजकीय आंदोलनातील प्रकरणात जामीन अर्ज दाखल केला होता. आज गिरगाव न्यायालयाने तो फेटाळून लावला. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू […]

Elevator of an under-construction building collapses in Ahmedabad
देश

अहमदाबादमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळली, 8 कामगारांचा दुर्दैवी अंत

गुजरात : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बांधकामाधीन इमारतीची ही लिफ्ट कशी कोसळली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात विद्यापीठाच्या कॅम्पसजवळ ही इमारत बांधली जात होती. अहमदाबाद झोन 1 च्या पोलिस उपायुक्त लविना सिन्हा यांनी […]

Planning should be done so that students are not inconvenienced in terms of hostels
महाराष्ट्र मुंबई

विद्यार्थ्यांची वसतिगृहाबाबत गैरसोय होणार नाही असे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना वेळेत वसतिगृह प्रवेश न मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे वसतिगृहाच्या देखभाल, नूतनीकरण, दुरुस्ती अशा प्रशासकीय अडचणीमुळे विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित रहाणार याची खबरदारी घेऊन वसतिगृहाच्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी कालबद्ध पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. मंत्रालयात मुंबईतील शासकीय वसतीगृह महाविद्यालय, संस्थाबाबत […]

Maharashtra Governor inaugurates 55th Youth Festival; felicitates Ashok Saraf on completion of 75
मनोरंजन महाराष्ट्र

अशोक सराफ यांनी नाट्य-सिने क्षेत्रात एव्हरेस्ट सर केले – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : आपण हिमालयाच्या कुशीत जन्मलो. मात्र आपल्याला कला, साहित्य व संगीत शिकण्याचे भाग्य लाभले नाही. अशोक सराफ यांनी त्याउलट आपल्या कलेच्या जोरावर नाट्य – सिने क्षेत्रात एव्हरेस्ट सर केले, असे सांगताना युवकांनी कुठल्याही क्षेत्रात काम करावे परंतु अशोक सराफ यांच्याप्रमाणे निवडलेल्या क्षेत्रामध्ये उंची गाठण्याचा ध्यास घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी […]

Governor Minister US Consul attend First Interactive meeting of Universities in Maharashtra and US
महाराष्ट्र मुंबई शैक्षणिक

भारत आणि अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सहकार्याच्या दृष्टीने विचारमंथन आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : शिक्षणाला कोणत्याही भौगोलिक सीमा नसतात. शिक्षण हे जीवननिर्मित, मानवनिर्मित आणि चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व निर्माण करणारे असावे. ऋग्वेदामध्ये सामूहिक मंथन आणि चिंतनाला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये उच्च शैक्षणिक सहकार्याच्या दृष्टीने सातत्याने विचार मंथन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठे व अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सहकार्य […]

The beautification works of Mumbai should be completed by the Municipal Corporation in time - Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील वाहतूक बेटं, स्कायवॉक, रस्ते दुभाजक, पदपथ यांना मिळणार झळाळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले ‘हे’ निर्देश

मुंबई : मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी वाहतूक बेटं, दुभाजक, पदपथ, स्कायवॉक, समुद्र किनारे, उद्याने यांच्या सुशोभीकरणाची कामे मुंबई महापालिकेने वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सुशोभीकरणाचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सादरीकरण केले. मुंबई महापालिकेच्या हद्दीत २०५० किमी लांबीचे रस्ते असून त्यामध्ये […]