The Supreme Court
देश

सर्व विवाहित आणि अविवाहित महिलांना सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्व महिलांना सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पुढे सांगितले की, विवाहित महिला देखील पीडित वर्गाचा भाग बनू शकतात कारण “इंटिमेट पार्टनर हिंसा ही एक वास्तविकता आहे”. “बलात्कार म्हणजे संमतीशिवाय लैंगिक संबंध आणि इंटिमेट पार्टनरद्वारे करण्यात येणार हिंसाचार हे वास्तव […]

Union Cabinet approval for redevelopment of Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Railway Station
देश महाराष्ट्र मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकास कार्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सीएसएमटी रेल्वे स्थानकासह एकूण तीन रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यासाठी १० हजार कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससहित नवी दिल्ली आणि अहमदाबाद रेल्वे […]

28 workers fell ill after inhaling ammonia gas leaked from a unit of a leading prawn processing plant
देश

कारखान्यात अमोनिया गॅस गळती झाल्यामुळे 28 मजुरांची प्रकृती बिघडली, चार जण गंभीर

ओडिशा : ओडिशातील बालासोर येथील एका कारखान्यात अमोनिया गॅस गळतीमुळे 28 मजूर आजारी पडले, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. गॅस गळतीमुळे आजारी पडलेल्या कामगारांमध्ये बहुतांश महिला आहेत. बालासोर येथील प्रॉन प्रोसेसिंग प्लांटच्या युनिटमध्ये बुधवारी (28 सप्टेंबर) हा अपघात झाला. मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. जुलालसेन जगदेव यांनी सांगितले की, कांतापारा येथील स्थानिक सामुदायिक आरोग्य केंद्रात […]

2 people were injured in a bus explosion in Jammu
देश

जम्मूत बसमध्ये स्फोट झाल्याने 2 जण जखमी, भारतीय लष्कराच्या चेकिंग पॉईंटसमोर घडली घटना

जम्मू काश्मीर : जम्मूच्या उधमपूर जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा एका बसमध्ये झालेल्या स्फोटामुळे खळबळ उडाली. या स्फोटात २ जण जखमी झाले आहेत, तर या बसच्या आसपास उभ्या असलेल्या इतर वाहनांचेही नुकसान झाले आहे. या स्फोटामागे दहशतवादी अँगल असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जम्मूच्या उधमपूर जिल्ह्यातील डुमेल चौक स्फोटाच्या आवाजाने हादरला. […]

Is It Bad to Sleep on Your Stomach?
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

झोपताना डोक्याखाली उशी न घेता झोपणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट? जाणून घ्या…

पुणे : अनेकांना मोठ्या फ्लफी उशांवर झोपायला आवडते, तर काहींना ते आरामदायी वाटत नाही. अनेकदा झोपेतून उठल्यानंतर आपल्याला मान किंवा पाठदुखी जाणवते, अशावेळी आपल्याला उशी न घेता झोपण्याचा मोह होऊ शकतो. मात्र, कोणत्याही निर्णयापर्यंत जाण्याअगोदर त्या गोष्टीचे फायदे आणि तोटे जाणून घ्यायला हवे. उशीशिवाय झोपण्याचे काही फायदे आहेत. तथापि, जर तुम्ही विशिष्ट स्थितीत झोपलात तरच […]

Eknath Shinde
देश महाराष्ट्र

पीएफआय संघटनेवरील बंदीचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; केंद्रीय गृहमंत्र्यांचे मानले आभार

मुंबई : देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे. पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपास यंत्रणांनी केलेल्या […]

Taxi and auto base fares in Mumbai
महाराष्ट्र मुंबई

मुंबईत टॅक्सी आणि ऑटोच्या मूळ भाड्यात वाढ, नवीन दर 1 ऑक्टोबरपासून लागू होणार

मुंबई : मुंबईत टॅक्सी आणि ऑटोच्या मूळ भाड्यात अनुक्रमे 3 आणि 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. हे नवीन दर 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगरातील प्रवाशांना टॅक्सी किंवा ऑटोमध्ये प्रवास करण्यासाठी 28 आणि 23 रुपयांचे मूळ भाडे द्यावे लागेल. नवीन भाडे 1 ऑक्टोबरपासून लागू होईल, असे मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) […]

UGC & AICTE has advised students not to travel to Pakistan for pursuing higher education
महाराष्ट्र शैक्षणिक

इमाव, विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना दिलासा; परदेशातील उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तींची संख्या वाढवली

मुंबई : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तींची संख्या दहा वरून पन्नास करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. २०२२-२३ या चालू वर्षापासून त्याचा लाभ मिळेल. यासाठीची पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची […]

Mantralaya Mumbai
महाराष्ट्र शैक्षणिक

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना

मुंबई : राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेत शिष्यवृत्तीची रक्कम ५० हजारापर्यंत वाढविण्यात येणार आहे. वर्ष २०११ मध्ये ही शिष्यवृत्तीची रक्कम २५ हजार रुपये इतकी होती. २०१८ मध्ये देखील यात काही बदल झाले नाहीत. केवळ […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

इतर मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांसाठी 72 वसतीगृहे सुरु करणार

मुंबई : इतर मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी प्रत्येकी एक अशी ७२ शासकीय वसतीगृहे सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रवर्गातील व्यावसायीक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी कोणतीही वसतीगृहांची सोय नाही. लोकप्रतिनिधींकडून शासकीय वसतीगृह भाड्याच्या इमारतीत सुरु करण्याबाबत […]