पुणे : बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या (शनिवार-रविवार) मध्यरात्री नियंत्रित स्फोट करून पाडण्यात येणार आहे. त्यासाठी १ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वा. ते २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ब्रेकिंग! RBI ने सलग चौथ्यांदा वाढवले रेपो रेट, कर्ज आणखी महागणार
नवी दिल्ली : आरबीआयने सलग चौथ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. मध्यवर्ती बँकेने पॉलिसी व्याजदरात 50 आधार अंकांची वाढ केली आहे. यासह रेपो दर 5.90 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो तीन वर्षांतील उच्चांक आहे. RBI बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर. या वाढीमुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. रेपो दरात […]
शेतकऱ्यांना दिलासा! अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना 755 कोटी रुपयांची मदत
मुंबई : अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. याचा राज्यातील अंदाजे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. […]
बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात
मुंबई : राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असून यासाठीच्या नोंदणीची सुरूवात येत्या 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह […]
समाज विघातक प्रवृत्तींवर राज्य सरकार कठोर कारवाई करेल – देवेंद्र फडणवीस
मुंबई : ‘पीएफआय’बाबत सातत्याने इनपुट्स होते. समाजात अफवा पसरवून त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त करण्यासाठी पैसा खर्च केला जात होता. त्यामुळे सर्व ते पुरावे हाती आल्यानंतरच केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी आणली आहे. राज्यातसुद्धा कोणत्याही समाज विघातक प्रवृत्तींची गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईत आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, केरळने […]
शेतकऱ्यांसाठी 2 लाख सौर कृषिपंप, कृषी फिडर सौरउर्जेवर आणणार
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख सौर कृषिपंप, मार्च 2022 पर्यंतच्या सर्व शेतीपंप जोडण्यांचा अनुशेष पूर्ण करणे आणि कृषी फिडर सौर उर्जेवर आणणे, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत घेण्यात आले. वांद्रे येथील प्रकाशगड कार्यालयात महाऊर्जा नियामक मंडळाची बैठक उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झाली, त्या बैठकीत हे […]
कुळगाव- बदलापूरमधील पूर रेषेच्या फेरसर्वेक्षणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : कुळगांव- बदलापूर शहरातून जाणाऱ्या पूर नियंत्रण रेषेचे नगरपरिषद आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने फेरसर्वेक्षण करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. त्यासोबतच कोविड काळातील केलेल्या खर्चाचे तसेच नगरपरिषदेला मुद्रांक शुल्काचे अनुदानही लवकरात लवकर दिले जावे, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेशी निगडीत विविध विषयांबाबत सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्री शिंदे […]
मुंबईचा कायापालट करण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांना पूर्ण करून मुंबईचा कायापालट करण्यासाठी यंत्रणांनी कामांची गती वाढवावी, तसेच कामकाजात पारदर्शकता आणावी असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. गृहनिर्माण विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी बांद्रा येथील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव […]
पुण्यात भीषण अपघात! मिक्सर कंटेनरची अनेक वाहनांना धडक, एकाचा मृत्यू तर 3 जखमी
पुणे : पुण्यातील हडपसर येथे एका मिक्सर कंटेनरची चार रिक्षा आणि कारला जोरदार धडक बसली. त्यानंतर कंटेनर एका झाडाला धडकून पलटी झाला. हे झाड कोसळून एका व्यक्तीच्या अंगावर पडले. या भीषण अपघातात १ व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिक्सर कंटेनरने चार रिक्षा आणि […]
ब्रेकिंग! अविवाहित महिला 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करू शकते, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
नवी दिल्ली : अविवाहित महिला २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करू शकते, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. सर्व महिलांना सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. SC ने म्हटले आहे की एखाद्या महिलेची वैवाहिक स्थिती नको असलेली गर्भधारणा गर्भपात करण्याचा तिचा अधिकार हिरावून घेण्याचे कारण असू शकत नाही. “अविवाहित आणि अविवाहित महिलांना […]








