To promote employment generation through agribusiness industries - Guardian Minister Dadaji Bhuse
नाशिक महाराष्ट्र

कृषीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रोजगार‍ निर्मितीला चालना देणार – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक : नाशिक हा शेतीप्रधान जिल्हा असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने शेती व्यवसाय विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. येणाऱ्या काळात कृषी उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला निश्चित चालना देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील उद्योजकांच्या संस्थांचे पदाधिकारी व संबंधित प्रमुख अधिकारी यांची संयुक्त […]

the recruitment process
महाराष्ट्र

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार रोजगार मेळावा

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अशाच प्रकारच्या रोजगार मेळाव्यांचे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नियोजनपूर्वक आयोजन करण्यात यावे अशा सूचना कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्या. प्रधानमंत्री कौशल्य व महारोजगार मेळावा राज्यभरात आयोजित करण्याबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. […]

Awareness campaign should be conducted for implementation of Kotpa Act – Chief Secretary Manu Kumar Srivastava
महाराष्ट्र

कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे – मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

मुंबई : कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी आज येथे दिल्या. मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य स्तरीय राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समन्वय समितीची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. मुख्य सचिव यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य […]

Tukaram Mundhe will join as Health Services Commissioner
महाराष्ट्र मुंबई

आरोग्य सेवा आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू

मुंबई : आरोग्‍य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक पदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून मुंढे यांनी कार्यभार स्वीकारला. त्‍यानंतर त्‍यांनी विविध आरोग्‍य कार्यक्रम व कार्यालयीन व्‍यवस्‍थेचा आढावा घेतला. यावेळी आरोग्‍य आयुक्‍तालयातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राज्‍यातील जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी कटिबध्‍द […]

“Goshta Eka Paithnichi” awarded National Award for Best Marathi Film, Marathi Films and Actors awarded National Awards in various categories
देश मनोरंजन

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, मराठी चित्रपट व कलाकारांना विविध श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

दिल्ली : ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटास सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी विविध श्रेणीत मराठी चित्रपटांना ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’ ने गौरविण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने राष्ट्रपतींच्या […]

Rise in the price of domestic gas cylinders once again
अर्थकारण देश

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात, आजपासून 25.50 रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून 25.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. या कपातीनंतर मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1811.50 रुपयांवर आली आहे. सलग सहाव्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत […]

Lion Statue Atop New Parliament Building Does Not Violate State Emblem Act : Supreme Court
देश

ब्रेकिंग! संसदेच्या इमारतीवरील सिंहाचा पुतळा राज्य चिन्ह कायद्याचे उल्लंघन करत नाही – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग म्हणून निर्माणाधीन संसदेच्या इमारतीवर उभारण्यात आलेले सिंहाचे शिल्प भारतीय राज्य चिन्ह (अयोग्य वापरास प्रतिबंध) कायदा, 2005 चे उल्लंघन करत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले. न्यायमूर्ती एमआर शाह आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने दोन वकिल अल्दानिश रेन आणि रमेश कुमार मिश्रा यांनी दाखल केलेली जनहित याचिका फेटाळून […]

2 thousand girls got employment in Tata company
नांदेड महाराष्ट्र

2 हजार मुलींना टाटा कंपनीत मिळाला रोजगार

नांदेड : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात आयोजित रोजगार मेळाव्यात तब्बल २ हजार मुलींची टाटा सारख्या नामांकित कंपनीत निवड झाली. टाटा कंपनीतर्फे निवड झालेल्यांना 16 हजार रुपयाचे विद्यावेतन, 3 लाख रुपयांचा विमा, जेवण व राहण्याची सुविधा देण्यासह 24 तास वैद्यकीय सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. नुकतीच […]

Chief Minister Eknath Shinde Not Feeling Well, doctors advised him to rest
महाराष्ट्र

स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : स्वातंत्र्यसैनिकांनी देशाप्रती केलेल्या त्यागाची जाणीव असून त्यांच्या आणि कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाही देतानाच शासकीय लाभांपासून ते वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयात स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विविध मागण्यांबाबत बैठक झाली. आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना शासकीय […]

Diwali bonus announced for health workers including Mumbai Municipal Corporation employees and teachers; employees of BEST
महाराष्ट्र मुंबई

मुंबई महापालिका कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांच्यासह आरोग्य सेविकांना दिवाळी बोनस जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेचे कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रूपये तर आरोग्य सेविकांना एका महिन्याचे वेतन दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. त्यावेळी […]