NEW GERMAN CONSUL GENERAL CALLS ON GOVERNOR KOSHYARI; DISCUSSES ENHANCING EDUCATIONAL COOPERATION
महाराष्ट्र मुंबई

जर्मनीचे नवे वाणिज्यदूत एकिम फेबिग यांनी घेतली राज्यपालांची भेट, शैक्षणिक सहकार्य वाढविण्यावर चर्चा

मुंबई : जर्मनीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत एकिम फेबिग यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. फेबिग म्हणाले, जर्मनीची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक असून उत्पादन, स्वयंचलित वाहन व तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या राज्यात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. जर्मनीत आज अंदाजे ३५ हजार भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असून अलिकडे हे प्रमाण सातत्याने […]

new electricity rules
महाराष्ट्र

वीज मनोरे व वाहिन्या उभारण्यासाठीच्या जमिनीसाठी मोबदल्याचे सुधारित धोरण

मुंबई : अति उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. वीज मनोरा आणि वाहिनी उभारण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण केले जात नाही. केवळ जमिनीचा वापर केला जातो. मनोरा उभारताना जमिनीच्या आणि पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपोटी मोबदला दिला जातो. मात्र यासाठी सध्या असलेल्या […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

राज्यात विविध ठिकाणी जिल्हा तसेच दिवाणी न्यायालये स्थापन करणार, पदनिर्मितीसही मान्यता

मुंबई : माणगाव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत, वाई, येवला, परांडा येथे न्यायालये स्थापन करून पदनिर्मिती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. रायगड-अलिबाग जिल्ह्यातील माणगाव येथे जिल्हा न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यात येऊन २० पदांना मान्यता देण्यात येत आहे. यासाठी १ कोटी ११ लाख ३१ हजार इतका खर्च […]

Horticulture Minister Sandipan Bhumare
महाराष्ट्र शेती

कांदाचाळ साठवणूक मर्यादेत 50 मेट्रिक टनापर्यंत वाढ, फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

मुंबई : राज्यात कांदाचाळीकरिता पाच मेट्रिक टन ते 25 मेट्रिक टनाची मर्यादा वाढवून ती 50 मेट्रिक टनापर्यंत वाढवण्यासाठीचे निर्देश फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले. फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मंत्री भुमरे म्हणाले, महाराष्ट्र कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. राज्यातील कांदा देश आणि विदेशातही निर्यात होतो. कांदा साठवण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत कांदाचाळीस अनुदान […]

Department of Energy signs MoU with King's Gas Company for production of Liquid Natural Gas
महाराष्ट्र

ऊर्जा विभागाचा लिक्विड नॅचरल गॅस निर्मितीसंदर्भात किंग्स गॅस कंपनीसोबत सामंजस्य करार

मुंबई : लिक्विड नॅचरल गॅस निर्मिती संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभाग आणि कतार येथील किंग्स गॅस कंपनी यांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या सामंजस्य कराराच्या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण, ऊर्जा विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, डॉ. पी. अनबलगन, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विद्युत निर्मिती कंपनी, […]

Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

आज संपूर्ण राज्यात पावसाचा येलो अलर्ट, अनेक जिल्ह्यांत विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

पुणे : हवामान खात्याकडून आज संपूर्ण राज्यभरात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ११ ते १३ ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आला. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर यादरम्यान राज्यात काही ठिकाणी ३०-४० किमी प्रति तास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून विजेच्या कडकडाटासह हलक्या […]

Anil Deshmukh had traveled by plane on February 15
महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! अनिल देशमुख यांना मोठा दिलासा, SC चा जामीन आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार

मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे. त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. या निर्णयाला विरोध करत ईडीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार […]

पुणे महाराष्ट्र

बदलत्या परिस्थितीस सामोरी जाणारी आरोग्य व्यवस्था निर्मितीस प्राधान्य द्यावे – आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे

पुणे : बदलत्या परिस्थितीस सक्षमपणे सामोरी जाणारी ‘आरोग्य व्यवस्था’ निर्मितीस प्राधान्य दिले जावे, असे आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. मुंढे यांनी आरोग्य सेवेतील पुणे येथील विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. आरोग्यसेवा विषयीची माहिती अद्ययावत ठेवून त्यांचा नियोजन व संस्थांच्या सेवांच्या विकासासाठी वापर करावा, आरोग्यासंबंधी ऋतूनुसार आरोग्य सेवांची तयारी […]

Guardian Minister Mangalprabhat Lodha to launch one window scheme for disabled
महाराष्ट्र मुंबई

महिला बचतगटांच्या उत्पादनांचा 11 व 12 रोजी दीपावली मेळावा

मुंबई : महिला बचत गटांची विविध उत्पादने, दिवाळी फराळ आणि दिवाळी उपयोगी साहित्याला बाजारपेठ मिळावी यासाठी मुंबई शहरातील स्वयंसहायता बचत गटांचा उद्या मंगळवार दि. ११ आणि बुधवार दि. १२ ऑक्टोबर रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे मेळावा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती, […]

First adoption process in the country under Juvenile Justice Act 2015 amended law in Akola
महाराष्ट्र

बालन्याय अधिनियम 2015 सुधारित कायद्यान्वये देशातील पहिली दत्तक प्रक्रिया अकोल्यात

अकोला : बालन्याय अधिनियम : मुलांची काळजी आणि संरक्षण २०१५ ह्या कायद्यात सन २०२१ ला सुधारणा करण्यात आली. या सुधारणेनुसार, अनाथालयातील बालकांना दत्तक देण्याची प्रक्रिया, जी न्यायालयातून होत असे त्याऐवजी ती जिल्हादंडाधिकारी अर्थात जिल्हाधिकाऱ्यांकरवी करण्यात येते. या बदलानंतर दत्तक हस्तांतरण आदेश देणाऱ्या पहिल्या जिल्हाधिकारी अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा ठरल्या आहेत. उत्कर्ष शिशुगृहातील साडेचार महिने वयाची […]