पुणे : पुणे येथे पुढील वर्षी जून 2023 मध्ये होणाऱ्या जी-२० राष्ट्रांच्या परिषदेबाबत पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव अमितेश कुमार सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे बैठक घेण्यात आली. बैठकीस पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती योजनेबाबत मंत्रिमंडळ उप समिती स्थापन ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा या योजनेत घ्यावयाची कामे, अंमलबजावणी व इतर निकष सुधारित करण्याबाबत मंत्री मंडळास शिफारस करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या समितीच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री तर सदस्य म्हणून वन […]
ऑक्टोबरमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आत्तापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 25 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. […]
…तोपर्यंत संजय राऊत यांच्या जामिनावर निर्णय घेऊ शकत नाही, न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणी दाखल केलेल्या जामीन याचिकेवर मुंबई न्यायालयाने बुधवारी आपला निर्णय राखून ठेवला. विशेष न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी या प्रकरणातील सहआरोपी असलेल्या राऊत यांचा कथित सहकारी प्रवीण राऊत याच्या जामीन अर्जावरही निर्णय राखून ठेवला आहे. जोपर्यंत प्रवीण राऊतच्या खटल्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत संजय राऊतच्या जामिनावर […]
माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत भारत जोडो यात्रेदरम्यान जखमी, हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु
हैदराबाद : काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत तेलंगणातील हैदराबाद येथील वासवी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या उजव्या डोळ्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली असल्याची माहिती आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान ते खाली पडले होते आणि त्यांना दुखापत झाली होती. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, भारत जोडो यात्रेत राज्याचे माजी ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत सहभागी झाले […]
कझाकस्तान येथे जिम्नॅस्टिक्स स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
मुंबई : कझाकस्तान येथे सप्टेंबर महिन्यात झालेल्या 12 व्या एशियन ऍक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील पदक विजेत्या महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक खेळाडूंचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी 5 सुवर्ण, 4 रौप्य व 11 कांस्य पदकांची कमाई केली. बृहन्मुंबई जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष […]
मतदानाच्या दिवशी मतदान कल चाचणीस प्रतिबंध
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने १६६- अंधेरी (पूर्व) या महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घोषित केली केली आहे. या निवडणुकीकरिता दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या मतदानाच्या दिवशी म्हणजेच दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६.३० या कालावधीत मतदान कल चाचणी (EXIT POLL) घेण्यास […]
इटालीयन गुंतवणूकदारांसाठी राज्याकडून संपूर्ण सहकार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : इटली आणि भारताचे संबंध हे नेहमीच सौहार्दपूर्ण राहीले आहेत. गुंतवणूकदारांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्याकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. इंडो- इटालीयन औद्योगिक संबंधांची पाच दशके साजरे करण्यासाठी मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इटलीचे भारतातील राजदूत विंचेझो दे लुका, इंडो -इटालीयन चेंबर […]
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एससी, एसटी, ओबीसी प्रमाणे निर्वाह भत्ता
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार एससी/एसटी/ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला 60 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या अंतर्गत वसतीगृह, शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत […]
डीसीसीच्या ३०व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न
पुणे : संगणक क्षेत्रातील डेटा केअर कॉर्पोरेशनच्या ३०वा वर्धापन दिन व कंपनीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अनिल म्हस्के यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. डीसीसी आणि सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जेएम रोडला आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरात १५० जणांनी सहभाग घेतला यामध्ये १०१ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. यावेळी दत्ता खाडे सरचिटणीस […]









