G-20 delegates visited Shri Sant Tukaram Maharaj Palkhi
पुणे महाराष्ट्र

जी-२० प्रतिनिधींनी घेतले श्री संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन; याची देही याची डोळा अनुभवला पालखी सोहळा

पुणे : जी-२० ‘डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट’ बैठकीसाठी पुण्यात उपस्थित देश विदेशातील प्रतिनिधींनी पालखी सोहळ्याला हजेरी लावत ‘याची देही याची डोळा’ महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अनुभवली. यावेळी काही प्रतिनिधींनी श्री संत तुकाराम महाराज पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. पालकमंत्री चंदकांत पाटील यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज पादुका मंदिरजवळ फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार येथे जी-२० प्रतिनिधींसाठी पालखी सोहळा अनुभवण्यासाठी […]

Mukhyamantri Solar Krishi Vahini Yojana 2.0 : A strong alternative to conventional energy
महाराष्ट्र शेती

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० : पारंपरिक ऊर्जेला भक्कम पर्याय

मुंबई : ऊर्जा क्षेत्रातील संभाव्य बदलांचा वेध घेऊन सौर उर्जेला व्यापक चालना देणारी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ ही योजना शासनाने अंमलात आणली आहे. त्यात जास्तीत जास्त फीडर सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतीला दिवसा 12 तास वीजपुरवठ्याबरोबरच उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा भार कमी होणार आहे. सौर ऊर्जा स्वस्त आणि हरित ऊर्जा आहे. सौर […]

Government of Maharashtra
महाराष्ट्र सोलापूर

पंढरपूर मंदिरे अधिनियमात सुधारणा

मुंबई : पंढरपूर मंदिरे अधिनियम 1973 यात सुधारणा करण्यात आली असून या अधिनियमानुसार सल्लागार परिषदेच्या नामनिर्देशित सदस्यांचा पदावधी, हा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर शासनाने नियुक्त केलेल्या सदस्यांचा पदावधीइतका असणार आहे. या अधिनियमास पंढरपूर मंदिरे (सुधारणा) अधिनियम 2023 असे संबोधण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना दि. 22 मे 2023 रोजी जारी करण्यात आली आहे.

अर्थकारण देश महाराष्ट्र

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला कर परताव्यापोटी 7472 कोटी रूपये

नवी दिल्ली : केंद्र सरकारने, सर्व राज्यांना 59,140 कोटी रुपयांच्या नियमित मासिक हस्तांतरणाच्या तुलनेत कर हस्तांतरणाचा तिसरा हप्ता म्हणून 1,18,280 कोटी रुपये आज वितरित केले असून, महाराष्ट्र राज्याला कर परताव्यापोटी 7472 कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. सर्व राज्यांना जून 2023 मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक आगाऊ हप्ता जारी केला आहे, ज्यामुळे राज्यांना त्यांच्या […]

Class 12 Examination
महाराष्ट्र शैक्षणिक

बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे विलंब शुल्काने भरावयाच्या तारखांना मुदतवाढ

मुंबई : इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने विलंब शुल्काने भरण्यास रविवार दिनांक 18 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही आवेदनपत्रे विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक‍ शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच भरावी, असे आवाहन शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत […]

Goat-sheep rearing is the best option to strengthen rural economy
महाराष्ट्र

भटक्या जमाती, धनगर व तत्सम लाभार्थ्यांसाठी मेंढी-शेळी पालन अर्थसहाय्य योजना सुरु करणार

मुंबई : अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली राज्यातील भटक्या जमाती/ धनगर व तत्सम जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मेंढी-शेळी पालनाकरिता अर्थसहाय्य योजना लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्यातील भटक्या जमाती/ धनगर व तत्सम प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या संयुक्त दायित्व गटास (Joint Liability Group) राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून मेंढी/शेळी पालनाकरीता कर्ज […]

Deputy Chief Minister directs immediate action to take immediate action to recruit heirs of martyred policemen in Naxal attack on compassionate grounds
महाराष्ट्र

नक्षलवादी हल्ल्यातील शहीद पोलिसांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत घेण्यासंदर्भात त्वरित कार्यवाही करावी, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासन सेवेतील गट-अ व गट-ब च्या पदावर अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव […]

Prabhudeva becomes father, welcomes baby girl with second wife Himani Singh
मनोरंजन

प्रभुदेवा चौथ्यांदा झाला बाबा! पत्नी हिमानी सिंगसोबत केले चिमुकलीचे स्वागत

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक-कोरिओग्राफर प्रभू देवा चौथ्यांदा बाबा बनले असून त्यांची दुसरी पत्नी हिमानी सिंग यांनी मुंबईत एका मुलीला जन्म दिला आहे. वयाच्या 50 व्या वर्षी, प्रभू देवा पुन्हा बाबा झाले आहेत आणि आता ते पूर्ण झाल्याचे सांगतात. हिमानी व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट आहे आणि या दोघांनी 2020 मध्ये गुपचूप लग्नगाठ बांधली. ETimes शी एका स्पष्ट संभाषणात, […]

supreme court
देश

दिल्लीत रॅपिडो, ओला, उबेरच्या बाइक-टॅक्सी धावणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती

नवी दिल्ली : सध्या दिल्लीत ओला आणि उबर बाईक टॅक्सी धावणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. यासोबतच दिल्ली सरकारला लवकरच धोरण तयार करण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली, ज्यामध्ये दिल्लीत बाइक टॅक्सी चालविण्यास परवानगी देण्यात आली होती. प्रत्यक्षात यासंदर्भात सरकारने बजावलेल्या नोटीसला […]

24-year-old model dies after iron pillar collapses before fashion show
देश

फॅशन शो सुरू होण्यापूर्वी लोखंडी खांब कोसळून २४ वर्षीय मॉडेलचा मृत्यू

नोएडा : फॅशन शो सुरू होण्यापूर्वी लोखंडी खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेत २४ वर्षीय मॉडेल वंशिकाचा मृत्यू झाला. नोएडातील फिल्म सिटीत फॅशन शो सुरू होण्यापूर्वी ही दुर्घटना घडली. मॉडेल वंशिका चोपडाच्या मृत्यूप्रकरणी सेक्टर २० पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत मॉडेलचा भाऊ हर्ष चोपडानं पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर फॅशन शो आयोजक आणि इतर ४ […]